Download App

Satyajit Tambe यांचा शपथविधी अन् घोषणा अजित पवारांच्या नावानं

मुंबई : आज विधान परिषद सभागृहात शिक्षक, पदवीधर (Teacher and graduate constituency)निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या शपथविधीवेळी अचानक एकच वादा, अजित दादा, (Ajit Pawar)अशा घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MLA)आमदारांनी दिल्या. त्यामुळं उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. नेमका हा काय प्रकार आहे, त्यावेळी अनेकांना समजेनासं झाल्याचं पाहायला मिळालं.

आज शपथविधीवेळी सत्यजित तांबे हे शपथ घेण्यासाठी पुढे आले आणि एकच वादा, सत्यजित दादा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेच राष्ट्रवादी समर्थकांनी एकच वादा, अजित दादा अशा घोषणा देण्याला सुरुवात केली. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनं शपथविधी सोहळ्याचं ठिकाण दुमदुमलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

सत्यजित तांबे शपथ विधीच्यावेळी राष्ट्रवादीच्या समर्थकांनी अजित पवारांच्या घोषणा का दिल्या? याबद्दलची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक पदवीधर निवडणुकीत आम्हीच मविआची मते खाल्ली, असं जाहीर वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं.

ED चा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला दणका! पवारांच्या मर्जीतील ‘या’ नेत्याची मुंबईतील संपत्ती सील

नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघात आमचं चुकलं. सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती, अशी स्पष्ट भूमिकाही अजित पवार यांनी मांडली होती. त्यामुळं नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार असूनही अजित पवारांनी सत्यजित तांबेंच्या बाजूनं जोर लावला. त्यामुळं सत्यजित तांबे यांच्या विजयामागं अजित पवारांचाही मोठा हात असल्याची चर्चा सुरु झाली, त्यातच आता अशावेळी अजित पवारांच्या घोषणा दिल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालीय.

Tags

follow us