ED चा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला दणका! पवारांच्या मर्जीतील ‘या’ नेत्याची मुंबईतील संपत्ती सील

  • Written By: Published:
ED चा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला दणका! पवारांच्या मर्जीतील ‘या’ नेत्याची मुंबईतील संपत्ती सील

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरही ईडीकडून विरोधी पक्षातील नेत्यांविरोधातील कारवाईचा ससेमिरा असूनही सुरूच आहे. आता ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल (Praful Patel) व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची मुंबईतील मालमत्ता सील केली आहे. सक्तवसुली संचालनालयानं (ED) सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्वत: ही माहिती दिली आहे.

ईडीकडून पटेल यांच्या मुंबईतील सीजे हाऊसमधील घरावर टाच आणण्यात आली आहे. इक्बाल मिर्चीप्रकरणी (Iqbal Mirchi) ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सील करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये वरळी येथील सीजे हाऊस इमारतीमधील चार मजल्यांचा समावेश आहे. हे चारही मजले पटेल कुटुंबाच्या मालकीचे आहेत. ईडीच्या या कारवाईनंतर आता पटेल कुटुंबाला हे चारही मजले रिकामे करावे लागणार आहेत. याप्रकरणी यापूर्वीच काही संपत्ती जप्त करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ईडीने पटेल यांच्यावर कारवाई केली आहे.

Jayant Patil : या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केलाय, शिंदे-फडणवीसांवर टीकास्र

काय आहे प्रकरण?
मुंबईतील वरळी येथे प्रफुल्ल पटेल यांची सीजे हाऊस नावाची मोठी इमारत आहे. इमारतीच्या बांधकामाआधी त्याजागी छोटी इमारत होती. ती इमारत गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या ताब्यात असल्याचा आरोप आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीकडून या इमारतीची पुनर्बांधणी करण्यात आली. या पुनर्बांधणीच्या मोबदल्यात पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांना काही जागा आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दिली असल्याचं ईडीने सांगितलंय. या सर्व व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळं इक्बाल मिर्चीची पत्नी हाजरा आणि मुले आसिफ आणि जुनैद यांना या प्रकरणात अनेक वेळा समन्स बजावण्यात आले होते, परंतु ते हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळं ईडीने या प्रकरणात इक्बाल मिर्ची आणि कुटुंबाची विदेशातील मालमत्ताही जप्त केली आहे. दरम्यान, आता या प्रकरणात ईडीकडून सर्व तपास सुरु असून ईडीने पटेल यांच्या विरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून मालमत्ता जप्त केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube