Download App

सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? देवेंद्र फडणवीसांची टीका

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने गुरुवारी (15 जून) दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. पहिला म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि दुसरा निर्णय म्हणजे धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका आहे.

भाजपने कर्नाटकचा हा मुद्दा मोठा बनवला आहे. महाराष्ट्रातील भाजपने देखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे की ते आता का बोलत नाहीत? पुस्तकातून एखाद्याचे नाव काढता येते, पण हृदयातून काढता येत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे नाव तुम्ही पुसून टाकू शकत नाही, पण काँग्रेससोबत असलेल्या उद्धव ठाकरेंना आता काय म्हणायचे आहे? वीर सावरकरांचा हा अपमान तुम्ही (उद्धव ठाकरे) मान्य कराल का? फक्त खुर्चीपुरतेच सेटलमेंट करणार का? असा सवाल करत टीका केली आहे.

‘शिंदे हे मुख्यमंत्री होणार, हे फडणवीस यांना माहित नव्हतं’ : देशमुख यांनी भाजपला चोळले मीठ

उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असून यापूर्वीही वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद झाला आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाने इयत्ता सहावी ते दहावीच्या कन्नड आणि सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकांच्या सुधारणेला मंजुरी दिली. या अंतर्गत आणि आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि सावरकर यांच्याशी संबंधित धडे काढण्यात आले आहेत.

Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्यावरील फसवणुकीचे सर्व गुन्हे रद्द, सीबीआयने दिली क्लीन चिट

कर्नाटक मंत्रिमंडळाच्या बैठकीत समाजसुधारक सावित्रीबाई फुले, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंदिरा गांधी यांना लिहिलेली पत्रे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्यावरील कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Tags

follow us