‘शिंदे हे मुख्यमंत्री होणार, हे फडणवीस यांना माहित नव्हतं’ : देशमुख यांनी भाजपला चोळले मीठ

‘शिंदे हे मुख्यमंत्री होणार, हे फडणवीस यांना माहित नव्हतं’ : देशमुख यांनी भाजपला चोळले मीठ

Nitin Deshmukh : 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सिंहासन भेटलं, तर मी पुन्हा येईल असं म्हणणारे देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भावी मुख्यमंत्री मानल्या जाणाऱ्या फडणवीसांनी आपणहून उपमुख्यमंत्रीपद घेतलं की, त्यांना पक्षश्रेष्ठींनी डावलंलं, हा विषयी आज चर्चिल जातो. दरम्यान, याचविषयी आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी मोठं विधान केलं. अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यंत्री करायचं ठरवलं, हे मला एका महिन्यापूर्वीच माहित होतं, असं ते म्हणाले. (Nitin Deshmukh Said I knew a month ago that Eknath Shinde will be the Chief Minister)

ठाकरे गटाच्या ‘आवाज कुणाचा’ या कार्यक्रमात बोलतांना आमदार नितीन देशमुख म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा-सात महिन्यातच सत्तांतरीच्या हालचाली सुरू झाल्या. याची आम्हाला कुणकुण होती. मात्र, जाऊन जाऊन किती आमदार जातील? फारफार तर 20-22 आमदार फुटतील,असं वाटलं होतं. तेवढ्यानं सरकार पडणार नाही, असं वाटलं. कैसास पाटील आणि माझ्यात याविषयी चर्चाही झाली. पण उद्धव ठाकरेंना कसं सांगायचं, हे कळत नव्हतं. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या कानावर ती गोष्ट घातली नाही.

चरणमाळ घाटात अवैध दारुच्या वाहतुकीवर मोठी कारवाई, २२ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हा दाखल 

ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडायचं आहे, एवढचं देवेंद्र फडणवीस यांना माहीत होतं, मात्र शिंदे मुख्यमंत्री होणार हे सत्तांतराच्या महिनाभरापूर्वीच ठरलं होतं. शिंदे हे मुख्यमंत्री होणार हे फक्त एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच माहीत होते. मीच मुख्यमंत्री होणार आहे, असं एकनाथ शिंदे तसं मला बोललेही होते, असं देशमुख यांनी सांगितलं.

शिंदे गटातील जे वरिष्ठ नेते आहेत, ते सगळे आधीपासूनच एकत्र होते. गुलाबराव पाटील म्हणतात की, आम्ही नंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. पण तसं नाही. हे सगळे सिनियर नेते आधीपासूनच एकत्र होते, आणि शेवटी ते शिंदेंकडे आले असं त्यांनी दाखवलं. ते आधीपासून सगळे सोबत होते. शिंदे यांच्यासोबत नंतर नेत्यांची जी टीम आली, तेच या सत्तांतराचे सूत्रधार होते, असं देशमुख म्हणाले.

कैलास पाटील म्हणाले, दीड दोन वर्षापासून या सगळ्याचा सापळा रचला जात होता. त्या गटातील काही सूत्रधार मागील अनेक महिन्यांपासून बोलत होते की, आपण भाजपसोबत जाऊ, त्यासाठी उद्धव ठाकरेंना गळ घालू. पण, आमचं ठरलं होतं, काहीही झालं तरी ठाकरेंसोबत राहायचं, असं पाटील यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube