Dr. Baba Adhav : कष्टकऱ्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन

Baba adhav : कष्टकऱ्याचे नेते म्हणून सर्वश्रृत असलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे अल्पशा आजाराने आज (दि.8) पुण्यात निधन झाले. ते 95 वर्षांचे होते.

Dr. Baba Adhav : कष्टकऱ्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन

Dr. Baba Adhav : कष्टकऱ्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन

Senior Social Worker Dr. Baba Adhav Passes Away : कष्टकऱ्याचे नेते म्हणून सर्वश्रृत असलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे अल्पशा आजाराने आज (दि.8) पुण्यात निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने 28 नोव्हेंबर रोजी त्यांना पुना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. आढाव यांच्या हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते..

कष्टकऱ्यांसाठी वाहिले संपूर्ण जीवन

आढाव यांनी त्यांचे संपूर्ण जीवन असंघटित आणि वंचित कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी समर्पित केले होते. ‘हमाल पंचायती’ची स्थापना ही त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा ठरली. याच्या माध्यमातून आढाव यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटन केले. याशिवाय जातीय भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी ‘एक गाव एक पाणवठा’ या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व केले आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

बाबा आढाव यांचा जीवनप्रवास

बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 साली पुण्यात झाला होता. ते नाना पेठेतील नामांकीत आयुर्वेदिक डॉक्टर होते. नाना पेठ हा शहरातील बाजारपेठेचा भाग असल्याने अनेक व्यवसायांतील कामगार तिथे येत असत. त्यामुळे हमालांना येणार्‍या अनेक अडचणी आढाव यांच्या लक्षात येऊ लागल्या. हमालांचे शोषण होऊनही त्यांना कुठलेही कायदेशीर संरक्षण नसल्याचे त्यांनी पाहिले. या गोष्टींचा आढाव यांच्यावर खोलवर परिणाम झाला. अखेर त्यांनी १९६६ मध्ये आपला चांगला चाललेला डॉक्टरकीचा व्ववसाय सोडला आणि कामगारांच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले. 1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम त्यांनी चालवली होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते.

बाबा आढाव यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा

– 1942 : राष्ट्र सेवा दलाचे सदस्य; साने गुरुजी, एस.एम. जोशी यांच्यापासून प्रेरणा.
– 1948: विठोबा मंदिर दलित प्रवेश लढा व गांधीहत्यानंतर ब्राह्मणांचे संरक्षण.
– 1952 : अन्नधान्य दरवाढीविरुद्ध पहिला तुरुंगवास.
– 1955 : हमाल पंचायतीची स्थापना – हमालांच्या हक्कांसाठी लढा.
– 1955 : गोवा स्वातंत्र्य संग्रामात सहभाग.
– 1956 : संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभाग.
– 1959 : झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन आंदोलन.
– 1962 : धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी चळवळ; एका डोळ्याची दृष्टी गमावली.
– 1966 : पत्नी शीलाताईंशी विवाह; खाजगी वैद्यकीय सेवा सोडली.
– 1966 : हमालांसाठी क्रेडिट युनियनची स्थापना.
– 1968 : हमालांसाठी सामुदायिक केंद्र प्रकल्प.
– 1969 : माथाडी व हमाल कायदा – पहिला सामाजिक सुरक्षा कायदा.
– 1972: ‘एक गाव, एक पानवठा’ उपक्रम – दलितांना पाण्याचा हक्क.
– 1972: ‘कष्टाची भाकर’ – परवडणारे पौष्टिक भोजनालय सुरू.
– 1977 : पथकरी पंचायत स्थापना – फेरीवाल्यांचे हक्क.
– 1978 : देवदासी निर्मूलन परिषद – देवदासी महिलांचे पुनर्वसन.
– 1979 : हमाल नगर – हमालांसाठी परवडणारी घरे.

धार्मिक, जातीय आणि एकात्मतेसाठी प्रयत्न

– 1970: मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापना.
– 1982 : राष्ट्रीय एकात्मता समिती.
– 1989: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करायला प्रेरणा

विविध कामगार संघटना आणि उपक्रम

– 1993 : कचरा वेचकांसाठी ‘कागद काच पत्र कष्टकरी पंचायत’ स्थापना.
– 1993 : बांधकाम कामगार पंचायत.
– 1994 : रिक्षा पंचायत – ऑटो रिक्षा चालकांसाठी.
– 2000 : हमाल पंचायत विद्यालय व ग्रंथालय – असुरक्षित कामगारांच्या मुलांसाठी शाळा.
– 2005 : महाड ते दिल्ली सायकल रॅली – सामाजिक सुरक्षा कायद्याची मागणी.
– 2007: 20 संघटनांचे प्रतिनिधित्व करणारा सत्याग्रह – दिल्लीमध्ये.
– 2008 : अन्नधान्य दरवाढीविरुद्ध पुन्हा एकदा तुरुंगवास – 53 व्यांदा.
– 2012 : अरुणा रॉय यांच्यासह पेन्शन परिषद.
– 2013 : 40 कोटी अनौपचारिक कामगारांसाठी राष्ट्रीय स्तरावर सामाजिक सुरक्षा आणि पेन्शनसाठी चळवळ.

विशेष लढे आणि उपक्रम

– 2000 : जयपूर न्यायालयाजवळील मनूच्या मूर्तीविरोधात लढा.
– संपूर्ण जीवन : असंघटित कामगार, दलित, महिलांचे हक्क, धार्मिक एकता, आणि सामाजिक न्यायासाठी सातत्यपूर्ण लढा.

Exit mobile version