बाबा आढावांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महायुतीच्या विरोधात वातावरण निर्मिती; सदाभाऊ खोतांनी महाविकास आघाडीला घेरलं

बाबा आढावांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महायुतीच्या विरोधात वातावरण निर्मिती; सदाभाऊ खोतांनी महाविकास आघाडीला घेरलं

Sadabhau Khot Statement On Mahavikas Aghadi Baba Adhav Protest : राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा (Mahayuti) दणक्यात विजय झालाय. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पराभवाला सामोरं जावं लागलंय. दरम्यान पराभूत झालेल्या उमेदवारांनी मात्र ईव्हीएम मशिनमध्ये काहीतरी गडबड, काहीतरी घोटाळा झाल्याचा सूर धरला आहे. यावरून मात्र राज्यात चांगलंच वातावरण तापलेलं आहे. दरम्यान ईव्हीएम विरोधात (Baba Adhav Protest Against EVM) मागील तीन दिवस ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं. दरम्यान काल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून ते आंदोलन मागे घेतलंय.

एकनाथ शिंदे जेव्हा दाढीवरून हात फिरवतात, तेव्हा राष्ट्रात मोठं काहीतरी घडतं ; शिवसेना नेत्याचा सूचक इशारा?

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केलेल्या आत्मक्लेश आंदोलनावरून आता भाजप नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, बाबा आढाव यांच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे. ते समाजसेवक होते. त्यांनी अनेक आंदोलन श्रमिकांची या राज्यामध्ये केली आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून दिला.

जितदादांनी निवडणूक जिंकली, मात्र पिक्चर अभी बाकी है; युगेंद्र पवार थेट निवडणूक आयोगात

सदाभाऊ खोत म्हणाले की, परंतु काल त्यांनी केलेलं जे आंदोलन होतं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सुद्धा अनेक शंका खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे. EVM मशीन काँग्रेसच्या काळामध्ये (Maharashtra Politics) आलं. त्या काळामध्ये बाबा आढावाला मशीन योग्य आहे असं दिसत होतं का ?. हा एक मला पडलेला प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिला तर मुस्लिम एरियाच्या ठिकाणी महायुतीच्या विरोधामध्ये मत पडलेले दिसून येत आहेत. मग मुस्लिम बहुला जिथं होता त्या ठिकाणची मशीन होती, ही मशीन योग्य चाललेली होती का? या मशीनला त्यावेळी काय गडबड करावीशी असं का वाटलं नाही. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे, आदरणीय बाबा आढाव यांच्या खांद्यावरती बंदूक ठेऊन महाविकास आघाडी महायुतीच्या आघाडीच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करत आहे.

हे आता यातून स्पष्ट झालं आहे. तसेच त्यांना भेटी द्यायला येणारे नेते जर पाहिले तर निश्चितपणाने आगीत तेल कोण ओततंय? हा महाराष्ट्र चांगला ओळखतो, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. निवडणूक प्रक्रियेबाबत राज्यातील नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याचं निराकरण करण्याची जबाबदारी सरकारची असून सरकार ती जबाबदारी पाळत नसेल तर नागरिकांना आवाज उठविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ही भूमिका घेवून बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळताना देखील दिसत होता.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube