Download App

सुनील केदार यांचा मुक्काम कोठडीतच; जामीन अन् शिक्षेला स्थगिती न्यायालयाने नाकारली

Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणात काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या अडचणी अजूनही कमी झालेल्या नाहीत. या प्रकरणी त्यांना जामीन आणि शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी सत्र न्यायालयाने नाकारली आहे. सुनील केदार यांच्यासाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे. सुनील केदार यांना मायग्रेनचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयाती अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातील चार तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांची प्रकृती बरी असल्याचा अहवाल दिला होता. यानंतर सुनील केदार यांची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.

मोठी बातमी! जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदारांची आमदारकी रद्द 

नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने (Nagpur Session court) जिल्हा बँकेतील 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात केदार यांच्यासह सहा जणांना पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. तर प्रत्येकी साडेबारा लाखांचा दंडही ठोठाविला आहे. 2002 मध्ये केदार बँकेचे अध्यक्ष असताना 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल होऊन तपास सुरु झाला होता. आता या प्रकरणात बँकेने सुनील केदार, मुख्य रोखे दलाल केतन शेठ, बँकेचे तत्कालिन मॅनेजर अशोक चौधरी यांच्यासह आणखी तीन जणांना दोषी ठरवून शिक्षा झाली आहे.  या शिक्षेनंतर त्यांची आमदारकीही रद्द करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

1999 मध्ये सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. या दरम्यानच्या काळात बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंच्युरी डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस या खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी केले. पण या कंपन्यांकडून खरेदी केलेले शेअर्स प्राप्त झाले नाहीत किंवा ते बँकेच्या नावेही झाले नाहीत. कंपन्यांनी बँकेची रक्कमही परत केली नाही. कालांतराने या कंपन्या देखील दिवाळखोरीत निघाल्या.

काँग्रेस नेते सुनील केदार अडचणीत! नागपूर जिल्हा बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात दोषी

दरम्यान, या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. आता रुग्णालयातील त्यांचा मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात होते.  काही दिवसांपासून केदार यांना मायग्रेनचा त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

follow us