संजय राऊतांनी आता देवळात जाऊन ध्यान धारणा करावी, शहाजीबापूंचा खोचक टोला

Shahajibapu Patil Speek On Sanjay Raut : राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यातच पाटील त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी नैतिकता पाळून राजकारणातून दूर जात आता देवळात जात ध्यान धारणा करावी असा खोचक टोला शहाजीबापू पाटील […]

Untitled Design   2023 05 11T165319.776

Untitled Design 2023 05 11T165319.776

Shahajibapu Patil Speek On Sanjay Raut : राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यातच पाटील त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी नैतिकता पाळून राजकारणातून दूर जात आता देवळात जात ध्यान धारणा करावी असा खोचक टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे.

सुप्रीम कोर्टाने आज राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सत्तासंघर्षांवर महत्वाचा निर्णय दिला. यावर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावर कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर शिंदे – फडणवीस सरकार राज्यात स्थिरपण काम करू शकत. 16 आमदारांच्या अपात्रतेची निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार आहे. नार्वेकर हे कायदेतज्ञ आहे, ते न्यायाच्या बाजूनेच निर्णय घेतील असा विश्वास आम्हाला आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या घशात चालली होती ते वाचवण्याचे काम सुप्रीम कोर्टाने केले आहे. यापुढे बाळासाहेबांचे विचार घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने काम करतील.

खैरे साहेब तुम्ही मला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका, मंत्री सामंतांनी लगावला टोला

राऊतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांनी नैतिकता पाळून आता राज्याच्या राजकारणातून बाजूला जात कोठेतरी मंदिरात जाऊन ध्यान धारणा करावी. असा सल्ला पाटील यांनी राऊतांना दिला आहे. महाराष्ट्रात पेटवायचे काम काडेपेटी व रॉकेलचा डब्बा घेऊन राऊत हे करत आहे. राऊतांना सर्व पक्षांनी राजकारणातून बाजूला काढलं पाहिजे. उद्धव ठाकरेंना राहिलेली व उरलेली शिवसेना वाढवायची असेल तर पहिला राऊत यांना बाजूला काढलं पाहिजे. नाहीतर उद्धव सेना ही संपल्याशिवाय राहणार नाही.

सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी पुन्हा काढली अजित पवारांची खोडी

विधानसभा अध्यक्ष कोणत्याही पक्षाचा नसतो तर…
16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांच्या दरबारी गेला आहे. तर विधानसभा अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात तर ते संपूर्ण विधिमंडळाचे 288 आमदारांचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे यामुळे निणर्य भाजपच्या पारड्यात गेला हा विचार करणे चुकीचे आहे.

ठाकरेंच्या राजीनाम्यावरील पृथ्वीराज चव्हाणांचं भाकित अखेर खरं ठरलं!

शिंदे – फडणवीसात फूट पडणार नाही
विरोधकांकडून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र यांच्यामध्ये फूट पडणार नाही. तर आगामी निवडणुका आम्ही एकत्र लढवू व प्रचंड मताधिक्याने निवडून येऊ असा विश्वास यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version