केरळ काँग्रसकडून उमेदवारांची घोषणा, उमेदवारी न मिळाल्याने शमा मोहम्मद यांची नाराजी उघड

डॉ. शमा मोहम्मद या काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) सदस्य आहेत. व्यवसायाने दातांच्या डॉक्टर आहेत.

News Photo   2026 03 21T184249.919

केरळ काँग्रसकडून उमेदवारांची घोषणा, उमेदवारी न मिळाल्याने शमा मोहम्मद यांची नाराजी उघड

काँग्रेसने केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा केली आहे. (Congress) यानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टॅग करून ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. शमा मोहम्मद यांनी लिहिले आहे की, माझे नेते राहुल गांधी यांचा मी आदर करते. काँग्रेसच्या यादीत केवळ ९ महिलांना तिकीट मिळाल्याबद्दलही शमा मोहम्मद यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसने केरळमध्ये एकूण ९२ उमेदवार उभे केले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर टिप्पणी केल्यानंतर डॉ. शमा मोहम्मद देशभरात चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यांची पोस्ट ‘बॉडी शेमिंग’ मानली गेली होती. त्यानंतर त्या या पोस्टनंतर पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

खामेनींच्या हत्येचे समर्थन करतात का?  परराष्ट्र धोरणावर राहुल गांधींचा PM मोदींना थेट सवाल

शमा मोहम्मद यांनी ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिलं, “मला नाकारण्यात आलं, पण मी हारले नाही. मी आमचे नेते राहुल गांधी यांचे मनापासून कौतुक करते, आदर करते आणि प्रशंसा करते. मी त्यांना नम्रपणे विनंती करते की त्यांनी केरळ काँग्रेसच्या महिलांना मदत करावी. ९२ तिकिटांपैकी केवळ ९ तिकिटे महिलांना देण्यात आली. २४ लोकसभा जागांपैकी, वितरित केलेल्या १६ तिकिटांपैकी केवळ १ तिकीट महिलेला देण्यात आलं असंही त्या म्हणाल्या.

डॉ. शमा मोहम्मद या काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) सदस्य आहेत. व्यवसायाने दातांच्या डॉक्टर आहेत. शमा मोहम्मद यांनी मंगळूर येथील येनेपोया डेंटल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. केरळमधील कन्नूर जिल्ह्यात जन्मलेल्या शमा मोहम्मद यांचे प्राथमिक शिक्षण कुवेतमध्ये झाले. शमा मोहम्मद यांची पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल झाली आहे. त्यांनी ही पोस्ट २० मार्च रोजी दुपारी टाकली होती. त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.

Exit mobile version