Download App

‘त्या’ जाहिरातीवरुन शिवसेनेचा यू टर्न, आमच्या पक्षाचा संबंध नाही

Shambhuraj Desai ON Shivsena Advertisement:शिवसेनेने राज्यातील सर्व वृत्तपत्रात एक जाहिरात दिली आहे. त्या जाहिरातीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती असल्याचे दाखवले आहे. यावरुन भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी यू टर्न घेतला आहे. या जाहिरातीशी आमच्या पक्षाचा संबंध नाही. कोणत्यातरी हितचिंतकाने जाहिरात दिले असेल, असे म्हटले आहे.

शंभूराज देसाई म्हणाले की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या हितचिंतकाने ही जाहिरात दिली असेल. या जाहिरातीशी आमच्या पक्षाशी संबंध नाही. पण यामध्ये एक गोष्ट समाधानाची आहे की एक नंबर आणि दोन नंबरवर भाजप-शिवसेनेचे नेते आहेत. आम्ही दोन्ही मित्र पक्ष आणि युती 50 टक्क्यांच्या पुढं आहेत. हे या सर्व्हेवरुन दिसले आहे. आमच्यात एक नंबर आणि दोन नंबर यामध्ये कोणतीही रस्सीखेच नाही, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

मोदी-योगींचं कौतुक करणं पडलं महागात; राजकीय वादातून चिरडलं…

शिवसेनेतील मंत्र्यांची शाळा देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. युतीमधील मतभेदावर चर्चा झाली. यानंतर युतीला तडे जातील अशी विधाने माध्यमांसमोर करु नका अशा सूचना फडणवीसांनी मंत्र्यांना दिल्या असल्याची चर्चा आहे. यावर शंभूराज देसाई म्हणाले की आमची एकत्र बैठक झाली पण त्यात कोणी कोणाचे कान टोचले नाहीत. युतीला तडा जाणार नाही हे आमचे पहिलेच ठरले आहे. आगामी लोकसभा निवडणुका कशा लढवायच्या? विधानसभा निवडणुकांचे कसं नियोजन करायचे? अशा साकारत्माक बाबींवर चर्चा झाली. आमच्यात खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली, असे देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेने राज्यामध्ये एक सर्व्हे केला असून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रथम क्रमांकाची पसंती दर्शविण्यात आली होती. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या होती. ‘देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. यामध्ये एकनाथ शिंदे यांना 26.1 % टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 % जनतेने कौल दिल्याचं समोर आलं होतं. यानंतर मात्र, आता भाजपच्या नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया आल्या होत्या.

सीएम शिंदेंच्या ट्विटवर औरंगाबादचा उल्लेख; रोहित पवारांनी स्क्रीनशॉट शेअर करत सुनावले

‘त्या’ जाहिरातीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून समर्थन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असेल, नसेल पण आम्ही दोघेही लोकांच्या मनात आहेत, हे सगळ्यात महत्वाचे आहे. शिवसेना-भाजप ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, सत्तेसाठी आणि मला काही मिळेल यासाठी युती झालेली नाही. म्हणून ही युती भक्कम आहे. शिवसेना-भाजप महायुती येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यांवर जिंकेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Tags

follow us