सीएम शिंदेंच्या ट्विटवर औरंगाबादचा उल्लेख; रोहित पवारांनी स्क्रीनशॉट शेअर करत सुनावले

सीएम शिंदेंच्या ट्विटवर औरंगाबादचा उल्लेख; रोहित पवारांनी स्क्रीनशॉट शेअर करत सुनावले

Rohit Pawar On Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या निर्णयाला केंद्र सरकारकडूनदेखील मान्यता मिळाली. आम्ही हा निर्णय घेतल्याये सरकारकडून कायम सांगण्यात येते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुनावले आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या ट्विटरवर छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख औरंगाबाद असा करण्यात आल्याचा स्क्रीनशॉट रोहित पवारांनी शेअर केला आहे.

शिंदेंनी ‘त्या’ जाहिरातीमधून हसं करुन घेतलं, हिंमत असेल तर निवडणुका घ्या

मुख्यमंत्री शिंदेंच्या ट्विटरवर औरंगाबाद असा उल्लेख आल्याने रोहित पवार यांनी ट्विट करत शिंदेंना सुनावले आहे. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री महोदय आजच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या फोटोचा जसा आपल्या पक्षाला विसर पडला तसाच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचाही विसर पडलेला दिसतोय… आणि विसर पडला नसेल तर नामांतराचा विषय तुम्ही केवळ राजकारणासाठी वापरता, असं समजायचं का? विरोधी पक्षाकडून अशी चूक झाली असती तर सरकारकडून त्याचं राजकारण झालं असतं. मला राजकारण करायची नाही, पण आपल्या कार्यालयाकडून झालेली चूक निदर्शनास आणून द्यायचीय.. ती आपण दुरुस्त कराल, ही अपेक्षा”!

दरम्यान, ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून देण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरण्यात आला होता. त्यावर विरोधकांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा विसर पडल्याची टीका करण्यात येते आहे. रोहित पवारांनीदेखील यावरुन शिंदेना सुनावले आहे.

Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube