Download App

Shambhuraj Desai : शिवसेना पक्षनिधीबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय, तीव्र संघर्ष होणार?

  • Written By: Last Updated:

सातारा : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. शिवसेना पक्ष (Shiv Sena Party) आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्याची लढाई जिंकल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. आता शिवसेना पक्षनिधीवर (party funds) शिंदे गटाने दावा केला आहे. यावर उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सांगिलते आहे.

शिवसेनेचा कोट्यवधी रुपयांचा पक्षनिधी हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे बोलल्या जाते. मात्र, शिवसेनेचा पक्ष निधी ठाकरे गटाने अन्य खात्यात वळवला असल्याची माहिती आपल्याला नाही. आम्ही आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख दरवर्षी निधी जमा करायचो. मात्र तो कोणत्या खात्यात ठेवत होते, याची माहिती मला नाही. याबाबत उद्या होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल. मग त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शंभुराज देसाई यांनी दिली.

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. या गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेवरही देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. देसाई म्हणाले, अमित शहा बोलले असतील ते त्यांचे मत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा ज्वलंत विचार सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या लावणीला बांधला. ते सोडवण्यासाठी आम्ही सहा महिन्यांपूर्वी प्रयत्न केले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि सेनेच अधिकृत असणारं धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला दिलं आहे. उठावावेळी शिवसेनेच्या 40 आमदारांनी, 13 खासदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आम्ही शिवसेना सोडलेली नाही. अशी भूमिका घेतली होती ती न्यायाची होती. सत्याची होती यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता पक्षाची कार्यपद्धती, पक्षाचे विचार आणि शाखा यावर कब्जा घेण्याची गरज नाही. ते नियमाप्रमाणे आमचं आहे, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.

Osmanabad Politics : खासदार ओमराजेंच्या खांद्यावर तानाजी सावंतांचा हात…

संजय राऊत यांनी शिंदे गटावर आरोप केलेत. २ हजार कोटी रुपयांना पक्ष आणि चिन्ह विकत घेतल्याचीही टीका राऊत यांनी केली. त्यावर बोलताना संभूराज देसाई म्हणाले, राऊत यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही. राऊत यांना निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्थेवरील वक्तव्याची किंमत चुकवावी लागेल, असंही देसाई यांनी सांगितले.

follow us