Download App

गुगली नक्की कोणाची? विकेट कुणाची ? पवार आणि फडणवीस पुन्हा भिडले !

  • Written By: Last Updated:

प्रफुल्ल साळुंखे:विशेष प्रतिनिधी

Sharad Pawar VS Devendra Fadnavis : राज्यात तीन वर्षानंतर पहाटेच्या शपथविधीचे भूत पुन्हा घोंगावू लागले आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्याकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दोघेही आता क्रिकेटच्या भाषेत दावे करून लागले आहेत. सत्तास्थापनेसाठी शरद पवार यांनी प्रस्ताव दिला होता. मंत्रिमंडळ वाटप झाले होते. ऐनवेळी शरद पवार यांनी पलटी मारली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यावर शरद पवार यांनी आपण गुगली टाकली ते बोल्ड झाले, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. त्यावर फडणवीस यांनी पुन्हा पलटवार केला. एकमेंकाना उघडे पाडण्याची स्पर्धा रंगली खरी, पण सत्तेसाठी काहीही हे मात्र खरे. पहाटेच्या शपथविधीवरून राजकीय नाट्य रंगले आहे. नेमकी काय राजकीय परिस्थिती होती ? कुणाच्या गुगलीने कोण क्लीनबोल्ड झाले हे जाणून घेऊया…(sharad pawar and devendra fadnavis clashed again)

त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती ? राज्यात शिवसेना युतीला बहुमत मिळाले. पण शिवसेनेने भाजपची साथ सोडली. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी फडणवीस यांना आमदार संख्या असून सत्ता स्थापन करता आली नाही. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावली. इकडे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली आहे. महाविकास आघाडी साकार झाली पण मुख्यमंत्री कोण? काँग्रेसला किती मंत्रिपदे या मुद्यावरून चांगलेच नाट्य रंगले होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नको यावर काँग्रेस-राष्ट्रवादी हे अडून बसले होते. शिंदेंऐवजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यास तयार झाले. पण राष्ट्रपती राजवट असल्याने राज्यपाल यांच्याकडे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव देणे शक्य नव्हते.

Eknath Shinde : माझं धाडस अन् फडणवीसांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री; सत्तास्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त शिंदेंचं भाषण

तर काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि काही नेत्यांमध्ये सरकार आणि मंत्रिमंडळाबाबत अनेक शंका होत्या. त्यामुळे सरकार स्थापनेच्या दाव्याला उशीर होत होता. काँग्रेस एेकत नाही, राष्ट्रपती राजवट हटत नाही. भाजपशी हात मिळवणी केल्यास केंद्र राज्यात सत्ता मिळवून देऊ शकते अशा द्विधा मनस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. संतापलेले अजित पवार बैठकीतून निघून गेले. त्या पाठोपाठ शरद पवार निघून गेले. इकडे शिवसेना सोडून गेल्याने भाजपाची कोंडी झाली होती.

Rahul Gandhi In Manipur: राहुल गांधींनी मणिपूरमध्ये उघडले ‘मोहब्बत की दुकान’, पाहा फोटो

फडणवीस यांची मी पुन्हा येणार ही घोषणा टिंगलेचा विषय बनली होती. राजकारणात काही अघटित घडेल, अशी शंका त्यांना त्या काळात आली होती. झालेही ही तसेच अजित पवार हे आपल्या समर्थक आमदारांसह राजभवनावर पोहोचले. सकाळची शपथविधी पार पडला. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेने एवढंच नव्हे तर अख्या महाराष्ट्रामध्ये एकच कल्लोळ झाला.
यात दोन गोष्टीवर विचार नक्कीच झाला पाहिजे. एकतर शपथविधी केंद्राच्या संमतीने झाला होता का? झाला असेल तर अचानक तो दोन दिवसात का थांबविला ? . जसे मध्य प्रदेश, गोवा आणि इतर राज्यात सत्ता हस्तगत केली त्याच पधतीने इथेही होऊ शकली असती पण तसे झाले नाही. नक्की केंद्रातून काही चक्र फिरली का? हा एक प्रश्न आहे.

दुसरे म्हणजे शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या विश्वासाहार्तवर प्रश्न निर्माण झाला. सोशल मीडियावर लोक राष्ट्रवादी विरोधात तुटून पडली होती. सहानुभूती मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी तयार झाली होती. केंद्रात समन्वयाची भूमिका घेणाऱ्या शरद पवार यांच्याविरोधात सर्वच राजकीय नेत्यांमध्ये संशय आणि शंकेचे वातावरण निर्माण झाले होते. ही प्रतिमा शरद पवार यांना परवडणारी होती ना राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारी होती. त्यातून हा निर्णय मागे झाला का? यावर विचार होणे गरजेचे आहे. एक मात्र खरे जेवढी भाजप सत्तेसाठी आतूर होती. तेवढी सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस देखील आतूर होती. खरे तर आज हा विषय काढून देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला आयते कोलित दिले आहे.

पूर्वी या विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी ही चूक होती हे सांगून पडदा टाकला होता. हा विषय उकरून काढला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादीवर घरणेशाहीचा आरोप करतात. त्याच राष्ट्रवादीसोबत आम्ही सकाळी शपथविधी केला यावर फडणवीस यांनी शिक्कामोर्तब करून टाकला. जर हा थपथविधी झाल्यावर सरकार टिकले असते तर पंतप्रधान यांनी राष्ट्रवादीवर अशी टीका केली असती का? म्हणजेच सत्तेसोबत असाल तर क्लिन, विरोधात असाल तर भ्रष्ट्राचारी हा धोंगीपणा खुद्द तेच उघडे पाडत आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणतात, पवार अर्धसत्य सांगत आहेत. मी ते पूर्ण सांगेल. सत्य काय असेल ते असो वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडल्याचा ठपका जसा शरद पवार यांच्या आयुष्यभर त्यांच्यासोबत आहे. सकाळचा शपथविधी आणि शिवसेना फूट ठपका देवेंद्र फडणवीस यांना आयुष्यभर वागवावा लागणार आहे.

Tags

follow us