आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत फेटा घालणार नाही; पंकजा मुडेंनी बाहेर काढलं मराठा कार्ड
Pankaja Munde : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या अधिक आक्रमक झाल्या आहेत. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तो मी पर्यंत फेटा बांधणार नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलता होत्या. (Pankaja Munde on Maratha Reservation)
https://www.youtube.com/watch?v=fgNKR9V0d6M
यावेळी सभेला संबोधित करतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, आता राजेंद्र म्हस्के मला म्हणाले, ताई फेटा बांधा. पण, मी म्हटलं, जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तो मी पर्यंत फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं, तेव्हा मी सांगितलं होतं, मी गळयात कोणताही फुलाची हार घालणार नाही. मग ते आरक्षण वाचलं तर लोकांनी खूप हार घातले.
त्या म्हणाल्या, आपल्याला दूध पोळलेलं आहे. त्यामुळं आता ताकही फुंकण पिण्याची वेळ आली आहे. २०२४ हे इतिहास घडवणारं, म्हणजे, इतिहास बदलवणारं वर्ष आहे. तुमच्या सगळ्यांची नि:स्वार्थ साथ मला पाहिजे, असं म्हणत मराठा कार्ड बाहेर काढलं.
औरंगाबाद की छ.संभाजीनगर? : पवारांनी बसवलेला धुराळा फडणवीसांनी पुन्हा उडवला
दरम्यान, या सभेपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी पत्रकारांनी बीआएसने दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मला आलेल्या ऑफरवर मी सध्या सिरीयसली बघितलंनाही. मात्र, मी बघणार नाही, असं नाही. कारण कोणत्याही व्यक्तीला सिरीयसनी न घेणं हा त्यांचा अपमान असतो, असं पंकजा म्हणाल्या.
गेल्या काही दिवसांपासून त्या पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू रंगली होती. त्याला कारणही तसेच होते. 2019 मध्ये पंकजा मुंडे यांनी परळीतील पराभवासाठी विरोधी उमेदवाराला खुराक पुरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागी भागवत कराड यांना केंद्रात राज्यमंत्री करण्यात आल्याने पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती, अशातच त्यांनी लक्षवेधी विधान केलं. त्यामुळं आता पंकजा मुंडे काय निर्णय घेतात, हेचं पाहणं महत्वाचं आहे.