Download App

राजकारणात फडतूस माणसांची नोंद घ्यायची नसते, शरद पवारांचा अतुल बेनकेंवर निशाणा

राजकारणात फडतूस माणसे असतात. ते काहीही विधानं करतात, त्यांची नोंद घ्यायची नसते, शरद पवारांची अतुल बेनकेंवर टीका

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar on Atul Benke : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असलेले जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी आज सकाळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना बेनकेंनी मोठा दावा केला. राजकारणात काहीही होऊ शकते. अगदी शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Gharat Ganapati: घरत गणपती चित्रपटात भूषण निकिताची जोडी जमली, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

शरद पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना बेनकेंनी केलेल्या दाव्याविषयी विचारलं असता पवार म्हणाले की, कोण अतुल बेनके? हे कोण आहेत? पक्षाच्या अध्यक्षाने उत्तर द्यावं, एवढा महत्वाचा माणूस आहे का? पत्रकारांनी कोणाबद्दल प्रश्न विचारावा, याचे काही तारतम्य ठेवावं. राजकारणात फडतूस माणसे असतात. ते काहीही विधानं करतात, त्यांची नोंद घ्यायची नसते, अशा शब्दात पवारांनी बेनकेंवर टीका केली.

माझा देह गेला तरी चालेल; अजय महाराजांचा फडणवीसांच्या बंगल्यासमोर ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात 

यावेळी बोलतांना पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावरही टीका केली. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत गेल्याचं वळसे पाटील सांगत आहे. याविषयी पवारांना विचारले असता ते म्हणाले, आंबेगाव तालुक्यात 30-40 वर्षापूर्वी पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय आहे? दिलीप वळसे पाटील किती वर्षे मंत्री आहेत? 35 वर्ष आमदार,25 वर्षे मंत्री राहिलेले आहे. या 25 वर्षात त्यांना आजतागायत प्रश्न सोडवता आला नाही आणि आता ते प्रश्नाची सोडवणूक कऱण्यासाठी सत्तेत गेल्याचं सांगतात. हा संधीसाधूपणा आहे, दुसरं काही नाही, अशी टीका पवारांनी केली.

बेनके नेमकं काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. या निवडणुकीला सामोरे जाताना काहीही होऊ शकते. यावर आता भाष्य करण्यात अर्थ नाही. महायुतीच्या जागावाटपात काहीही होऊ शकते. कदाचित अजित पवार आणि शरद पवार साहेबही एकत्र येऊ शकतात, असा दावा बेनकेंनी केली होता.

पवार-बेनके भेटीवर अजित पवार काय म्हणाले?
दरम्यान, अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतल्याने ते अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, अनेक आमदार माझीही मला भेट घेतात. बेनकेंनी शरद पवार यांची भेट घेतली तर त्यांना याबाबत विचारा. निवडणुका आल्या की काही लोकांना निवडणूक लढवायची असते. पण आमच्या पक्षाला ही जागा मिळणार नाही हे लक्षात आल्यावर आपण इथेच न राहता दुसऱ्या पक्षात जाऊ, असे अनेकांना वाटते. त्यामुळेच लोक एकमेकांच्या भेटी घेतील, असं अजित पवार म्हणाले.

follow us