Sharad Pawar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक सभा अत्यंत गाजली होती. याचं कारण म्हणजे ही सभा अक्षरशः भर पावसामध्ये शरद पवार यांनी घेतली होती. ही सभा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतली होती.
उपराष्ट्रपतींकडून PM मोदींची महात्मा गांधींशी तुलना; काँग्रेस नेत्यांचा संताप, म्हणाले…
त्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे ही पावसातील सभाच श्रीनिवास पाटील यांच्या विजयाचा कारण ठरल्याचं बोललं गेलं. दरम्यान त्यानंतर पावसातील सभा हा मुद्दा अनेकदा चर्चेला आला. त्यानंतर आता याच पावसातील सभेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शरद पवारांना टोला लगावलाय.
काय म्हणाले आशिष शेलार?
भाजप नेते आशिष शेलार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्यांना प्रश्न विचारण्यात आला. की, साताऱ्यात शरद पवारांनी पावसामध्ये सभा घेतल्यानंतर त्यांना यश मिळालं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी आता ठाणे आणि कल्याणमध्ये देखील लक्ष केंद्रित केलं आहे.यावर उत्तर देताना शेलार म्हणाले, स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी त्यांची ही धावपळ आहे.
‘आदित्य ठाकरे बैठकीत नाहीतर जेलमध्ये असणार’; नारायण राणेंनी सांगितली भविष्यवाणी
मागच्या वेळी पावसात सभा घेतल्यानंतर पुढच्या दीड वर्षात राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले. यावेळी पावसात सभा घेतल्यामुळे उरलेल्या दीड वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोणच्याएवढाही राहिल का? हा प्रश्न त्यांनी त्यांच्या मनाला विचारावा. @BJP4Mumbai @BJP4Maharashtra #NCP #BJP pic.twitter.com/bZHL7aCSPR
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 27, 2023
लोकशाहीमध्ये कोणी कुठे सभा घ्याव्यात? हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना सूचना देणारी मार्गदर्शन करणे मला संयुक्तिक वाटत नाही. पण सध्याचे वर्णन करायचं झालं. तर पावसात सभा घेतल्यानंतर पुढच्या दीड वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले. त्यामुळे आता जर त्यांनी पावसात सभा घेतली. तर उरलेल्या दीड वर्षांमध्ये राष्ट्रवादी लोणच्या एवढी तरी राहील का? असा टोला आशिष शेलार यांनी शरद पवार यांना लगावला आहे.