Sharad Pawar criticize state government on OBC and Maratha Reservation : राज्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश आलं. कारण आता राज्य सरकारने त्यावर मराठा आरक्षणाचा जीआर जारी केला आहे. मात्र त्यावर मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आले आहेत. त्यावर शरद पवार यांनी सरकारवर मराठाविरुद्ध ओबीसी जाणीवपूर्वक वातावरण तयार केलं जात आहे. असं म्हणत निशाणा साधला आहे.
राज्यामध्ये मराठाविरुद्ध ओबीसी जाणीवपूर्वक वातावरण तयार केलं जात आहे. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकारच्या हालचाल दिसत आहेत. मात्र त्यावर प्रत्यक्ष कृती कधी होईल? ते पाहावं लागेल. पण राज्य सरकार आज जी पावलं उचलत आहे.
Maharashtra Rain Upate : शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार! दत्तात्रय भरणे यांची दिलासादायक घोषणा
त्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये कटूता कमी करणे, सामंजस्य निर्माण करणे, गावात हे लोक एकत्र राहतील याची काळजी घ्यावी. आज सरकारने दोन समाजासाठी दोन समित्या केल्या. पण खरंतर या दोन समाजांना एकत्र घेऊन बसण्याची गरज आहे. हे काम मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. तसेच योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. असं म्हणत राज्यातील मराठा ओबीसी वादावर शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
स्टार परिवार अवॉर्ड्स 2025 चा दिमाखदार सोहळा; स्टार प्लसने साजरी केली गौरवशाली 25 वर्षे
तसेच यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मराठा आणि ओबीसी समाजाला एकत्र घेऊन बसण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ते म्हणाले की, ओबीसी आणि मराठा समाजाला एकत्र घेऊन बसले पाहिजे. एकत्र बसण्याचे काम मुख्यमंत्री यांनी घेतलं पाहिजे. आमच्या सारख्या अनेक लोकांची याबाबत त्यांना साथ मिळेल.