Sharad Pawar : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Dodo Nyaya Yatra) आज मुंबईत समारोप होतोय. या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर इंडिया आघाडीची भव्य सभा होत आहे. या सभेला देशभरातील इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. या सभेला संबोधित करतांना शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदींची गॅरंटी हे सध्या ऐकतोय, पण ही गॅरंटी चालणार नाही, असं ते म्हणाले.
या सभेला संबोधित करतांना शरद पवार म्हणाले, आज देशाची जी अवस्था भाजप सरकारने केली, त्याला आता बदलण्याची गरज आहे. हा बदलाव आपण एकत्रित येऊन करू शकतो. भाजपने आजवर केवळ देशातील जनतेला आश्वासनं दिलं. आश्वासनं देऊन भाजपने केवळ फसवणूक केली. जी आश्वासनं दिली होती, त्यातील एकही आश्वासनं भाजप सरकार पूर्ण करू शकलं नाही, भाजप वादे करतेय, पण दिलेले वादे पूर्ण करत नाही, त्यामुळं त्यांना हटण्यासाठी पुढं आलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.
पवार म्हणाले, मोदींची गॅरंटी हे सध्या ऐकतोय… ही गॅरंटी चालणार नाही. गॅरंटी देऊन चुकीचे आश्वासनं देऊन आपल्याला भरकटण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे देशाची हुकमत होती, त्यांनी दहा वर्ष फक्त कष्टकरी, शेतकरी, महिला, दलित आणि आदिवासी जनतेची फसवणूक केल्याची टीका पवारांनी केली.
सरकारमध्ये नेते नाहीत, फक्त डिलर
महाराष्ट्र सरकारमध्ये जेवढे लोक बसले आहेत, त्यातील एकही नेता नाही. ते फक्त डीलर आहेत. ते उद्धव ठाकरेंच्या नावावर मते घेऊन भाजपशी डिलिंग करतात. शरद पवारांच्या नावावर मते घेतात आणि भाजपशी डिलिंग करतता. हे सर्व डीलर आहेत. यांच्यातला कोणीही नेता नाही, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटारडे आहेत. मोदी म्हणजे खोटं बोलण्याची फॅक्ट्री आहे. ते खोटे बोलण्याचे सेलर आणि होलसेलर आहेत. मोदींनी आमच्या काकांनाच पळवलं. मोदी सगळ्यांची गॅरंटी देतात. ते आमच्या काकांची गॅरंटी देऊ शकतात, असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला.