मोहिते पाटलांसाठी विमानातून उडी मारली पण..,; सोलापुरात उत्तम जानकर-मोहिते पाटील संघर्ष पेटला…

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आमदार उत्तम जानकर आणि मोहिते पाटील कुटुंबात संघर्ष पेटला आहे.

Untitle (5)

Untitle (5)

Mla Uttam Jankar On Mohite Patil Family : मोहिते पाटलांसाठी मी जिवावर उदार होऊन विमानातून उडी मारली, दिलेला शब्द पाळला पण त्यांनी माझा जातीचा दाखल करण्याची रणनीती आखली होती, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर (Mla Uttam Jankar ) यांनी केला आहे. सोलापुरात विधानपरिषद निवडणुकीवरुन आमदार उत्तम जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात संघर्ष पेटल्याचं चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जानकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या भेटीला गेले आहेत. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

शेतकऱ्याला बैला दिला पण ‘तो’ आजारी निघाला; ‘सरकारच्या नियतीतच खोट’, रोहित पवारांनी संधी सोडली नाही…

पुढे बोलताना आमदार जानकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीला मी जिवावर उदार होऊन मोहिते पाटलांसाठी विमानातून उडी मारुन आलो होतो, दिलेला शब्द पाळला होता, तरीही त्यांच्या कुटुंबातील लोकांनी मी आमदार होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन माझा जातीचा दाखला रद्द करा अशी रणनीती आखली होती, अशी मानसिकता असेल तर ती चुकीची असल्याचा मोठा गौप्यस्फोट आमदार जानकर यांनी केला आहे.

सोलापुरात विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी पक्षानेही माझ्या मुलाचं नाव फिक्स केलं होतं. सगळं ठरलेलं असतानाही मोहिते पाटलांनी वसंत देशमुख यांना उमेदवारी देऊन त्यांचा अर्ज कायम ठेवला आहगे, त्याचे परिणाम या ठिकाणी झाले आहेत. आमचा महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा असल्याचं उत्तम जानकर यांनी स्पष्ट केलं आहे.

तुकाराम मुंढेंचा हंटर ! एकाच दिवसात 43 ठिकाणी छापेमारी; तब्बल कोट्यवधी रुपयांची सुपारी जप्त

मोहिते पाटलांच्या कुटुंबात कोण निर्णय घेतं कळतंच नाही?
सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या कुटुंबात निर्णय कोण घेतं हेच कळत नाही. निर्णय पुढच्या बाजूला खासदार करता आणि तो निर्णय फिरवणारी मागे यंत्रणा आहे. निवडणुकीत आघाड्या कराव्या लागतात कोणी काय करायचं हे सगळं आपण ठरवलं तर प्रत्येकवेळी ठरवलेली गोष्ट उध्वस्त केली जाते त्यामुळे त्यांचा निर्णयाचा हा अभाव असल्याची खोचक टीका आमदार जानकर यांनी मोहिते पाटील कुटुंबावर केलीयं.

दरम्यान, आता राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. माझी भूमिका मी स्पष्ट केलेले आहे. वसंत देशमुख यांना मी मतदान करणार नाही. त्यावरून माझा विश्वासघात झालेला आहे. माझ्या मुलाला उमेदवारी अर्ज दिलेला असताना त्यांनी गैरविश्वास दाखवून उमेदवारी अर्ज दाखल केला, असल्याचा गंभीर आरोप आमदा जानकर यांनी केला आहे.

Exit mobile version