माझा भाऊ गेला, तेव्हाच ‘तो’ विषय संपला…सुप्रिया सुळेंनी विलिनीकरणावर मौन सोडलं!

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणावर मौन सोडलं असून माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केलीयं.

Supriya Sule

Supriya Sule

MP Supriya Sule : ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्याच्या दोन-चार दिवसांत ज्या घटना घडल्या, त्यानंतर विलिनीकरणावर मी पडदा टाकला, असल्याचं म्हणत अखेर खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी विलिनीकरणार मौन सोडलंय. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरु आहेत. अशातच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं.

पुढे बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, विलिनीकरणाबाबत माझ्याशी कोणी बोललेलं नाही. ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्यानंतर दोन-चार दिवसांत ज्या काही घटना झाल्या. त्याच्यानंतर मी स्वत: या विषयावर पडदा टाकलेला आहे. त्याच्यामुळे यावर वेगळं अजून काही बोलायचं काही कारण नाही, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय.

विलिनीकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर माध्यमांकडून विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम म्हणायचं का? असा थेट सवाल केल्यानंतर माझा भाऊ गेला, तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, असं थेट स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलं आहे. अजितदादा असताना विलिनीकरणाची चर्चा सुरु होती. दादा माझ्याशी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आमच्या सगळ्यांशी बोलला होता. गोविंदबागेतील 17 जानेवारीचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी दाखवलेला आहे. त्यात नवीन काही नाही, जगाला सगळं माहिती असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय.

दादा आणि आम्ही काय करणार आहोत. हे संपूर्ण जगाला माहिती होतं. त्याच्यात फार लपवून ठेवलं असं काहीच नव्हतं. त्याच्यानंतर दााद अचानक निघून गेला. त्यानंतर माझ्याकडून त्याला पूर्णविराम दिला आहे. माझा भाऊ गेला विषय संपला काय अधिक बोलायचं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलिनीकरणाबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही आपली भूमिका मांडलीयं. आमदार रोहित पवार म्हणाले, विलिनीकरणाची चर्चा तर नाहीच आणि भाजपा सोबत असताना विलिनीकरणाचा तर विषय सुद्धा येत नाही. त्यामुळं आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे सत्तेचा अहंकार आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

Exit mobile version