Download App

महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण…शरद पवार गटाचे अजित पवारांना थेट प्रत्युत्तर

  • Written By: Last Updated:

मुंबईः अजित पवार (Ajit Pawar) हे सरकारमध्ये सहभागी होऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहे. त्याबाबत अजित पवारांनी जनतेसाठी खुले पत्र लिहिले आहे. त्यात अजित पवार यांनी पत्रामध्ये आपल्या निर्णयाच्या १०० दिवसांच्या पूर्तीचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर एक राजकीय टिप्पणी करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात याआधीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली. असे निर्णय त्या त्या वेळच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीनुसार नेत्यांना घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सरकारमध्ये सामील झाला, असे या पत्रात नमूद केले. या पत्रावर आता शरद पवार गटाने (Sharad Pawar) जोरदार टीका केली आहे. शंभर दिवसांचे कर्तृत्व सांगावे लागणे. यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येत आहे, असाही टोलाही लगावला आहे.

शंभर दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण…, शंभर दिवस छत्रपती फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे, शंभर दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचे…शंभर दिवस वारकऱ्यांवर, मराठा आंदोलकरांवर लाठीहल्ला करणाऱ्या नतदृष्यांसोबतचे…शंभर दिवस रुग्णालयांतील मृत्यूकांडास जबाबदार असंवेदनशील सरकारसोबतचे…शंभर दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार, प्रकल्प हिरावून घेणाऱ्या महाराष्ट्राविरोधकांसोबतचे, शंभर दिवस माताभगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तीसोबत राज्य कारभार करण्याचे, शंभर दिवस मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत, समाजाचे आरक्षण रखडणाऱ्या आरक्षणाविरोधकांसोबतचे, शंभर दिवस मराठी अस्मितचेची गळपेची करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांसोबतचे…असे शरद पवार गटाने एक्सवर म्हटले आहे. त्यामुळे आता यावरून अजित पवार व शरद पवार गटामध्ये जोरदार जुंपली असल्याचे दिसून येत आहे.

तेजस्विनी पंडितच्या ब्लू टिकवरुन रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल

ही धमक केवळ शरद पवारांमध्येच

तर अजित पवारांना डिवचणाऱ्या काही ओळीही शरद पवार गटाने लिहिल्या आहेत. पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्यापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही. जो तुम्ही गेले शंभर दिवस गहाण ठेवलात, किती मोठे संकट आले तरी, विचारांच्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहून कुणापुढे न झुकता महाराष्ट्राच्या हिताच्या ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आदरणीय शरद पवारांमध्ये आहे, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tags

follow us