तेजस्विनी पंडितच्या ब्लू टिकवरुन रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात टोलमाफीवरुन राजकारण तापले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) काही सवाल केले होते. यानंतर तिची एक्स अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकण्यात आली होती. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार? असे त्यांनी म्हटले आहे.
इतका कपटीपणा योग्य नाही
रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटले की विरोधात व्हिडिओ टाकला म्हणून ट्रोल गँग वापरून ट्रोल करायचं, ट्विटरची ब्लू टिक काढायची, हे अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार?
विरोधात व्हिडिओ टाकला म्हणून ट्रोल गँग वापरून ट्रोल करायचं, ट्विटर ची ब्लू टिक काढायची, हे अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार?
इतका कपटीपणा योग्य नाही. प्रत्येकाला विचारधारेचं, आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मुलभूत अधिकारही आहे, परंतु… https://t.co/IcRJmUfUyX
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 10, 2023
इतका कपटीपणा योग्य नाही. प्रत्येकाला विचारधारेचं, आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मुलभूत अधिकारही आहे, परंतु सत्तेचा गैरवापर करून आपण हा मुलभूत अधिकारही हिरावून घेणार का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
तेजस्विनी पंडितने काय म्हटले?
माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं. कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची’ इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून?
म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ???????
ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?
राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,
महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!
How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”… pic.twitter.com/qsJmPSYrI6— TEJASWWINI (@tejaswwini) October 8, 2023
X (टूट्विटर) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात, त्याबद्दल धन्यवाद. पण ह्या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही.
सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र ‘X’ फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्यवेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेंव्हा जेंव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे ! जय हिंद जय महाराष्ट्र!, असे तेजस्वीनीने म्हटले आहे.
अनेकदा आपण पाहिलं आहे अगदी ऑस्कर स्वीकारतानाही जागतिक व्यासपीठावर कलावंत सभोतालच्या सामाजिक परिस्थितीबद्दलच नव्हे तर थेट राजकीय भूमिका घेतानाही कचरत नाहीत. कारण त्या देशातील लोकशाही त्या कलावंतांना हमी देते कि तुम्ही घेतलेल्या भूमिकेसाठी तुमच्यावर कोणताही सूड उगविला जाणार नाही.… https://t.co/t5kaushCfG
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 10, 2023
मनसेचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, मनसेही भाजपवर हल्लाबोल करत तेजस्विनी पंडितच कौतुक केले आहे. काल घेतलेल्या भूमिकेचं स्वागतच पण त्यानंतर आज न घाबरता दाखविलेला ठामपणाही कौतुकास्पदच… सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या अशा निर्भीड कलावंतांना कायम सलाम करावासा वाटतो… मग ते रंगभूमीवर भूमिका वठवताना असो वा थेट सामाजिक, राजकीय भूमिका घेताना असो.