Download App

Sanjay Raut : पवारांनी गुगली अन् सिक्सही मारला, फडणवीसांचा पक्ष क्लीन बोल्ड झाला; राऊतांचा टोला

sanajy Raut on Devendra : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करणं म्हणजे पवारांचे ( Sharad Pawar) एकाच वेळेला गुगली आणि सिक्सर दोन्ही होते. पवारांना समजून घेण्यासाठी भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील हे मी आजही म्हणतो. कारण पवारांनी मविआ स्थापन केलं नसत तर राज्यातील राष्ट्रपती राजवट तोपर्यंत उठली नसती जोपर्यंत एखादं खोके सरकेर आलं नसत. तर त्या गुगलीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा वारंवार पक्ष क्लीन बोल्ड झाला. असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. ( Sharad Pawar hits Six and Googly Sanjay Raut Criticize Devendra Fadanvis )

राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींकडून खास गिफ्ट; शिंदे गटाला मिळणार 2 मंत्रिपदं

पुढे ते असं देखील म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर शरद पवारांनी जे सांगितलं ते शंभर टक्के सत्य आहे. कारण त्यावेळी राष्ट्रपती राजवट कधी निघेल याबाबत आम्ही चिंतेत होतो. आम्हाला माहीती होत की आम्ही बहुमताचा आकडा सिद्ध केला तरीही राज्यपाल बहुमत मानणार नाही. यावर तिन्ही पक्षांच एक मत होतं. ते आपल्याला झुलवत ठेवतील बहुमत मान्य करणार नाही. यावर मी आणि शरद पवार वारंवार चर्चा करत होतो की, राष्ट्रपती राजवट कशी उठवली जाईल? त्यातच एका भल्या पहाटे बातमी आली. राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि महाविकास आघाडीच्या सरकारचा मार्ग मोकळा झाला.

Asha Nadkarni: दुःखद! ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?
पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यात जोरदार जुंपली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवारांनी आमचा वापर करुन आमच्याशी डबल गेम खेळला. असं म्हटलं तसेच ते असं देखील म्हणाले की, शरद पवारांच्या तोंडी मी सत्य आणले याचा मला मोठा आनंद झाला आहे. परंतु हे अर्धच सत्य आहे. पवारांनी पूर्ण सत्य सांगितले नाही. मी गुगली फेकून पूर्ण सत्य बाहेर आणणार आहे. यातून मी बोल्ड झालेलो नाही. त्यांनी त्यांच्या पुतण्यालाच बोल्ड केले आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?
फडणवीस यांनी काल स्वत: सांगितलं की, भाजपसोबत सरकार स्थापन न करण्याच मत मी दोन दिवस आधी बदललं. जर मी माझं धोरण बदललं होतं तर त्याच्यानंतर दोन दिवसांनी फडणवीसांनी अजित पवारांसोबत शपथ घेण्याच काय कारण होतं? असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. पुढे पवार म्हणाले की, मी जर त्यांना फसवलं असे त्यांचे म्हणणे आहे तर तुम्ही का फसलात असा खोचक सवाल त्यांनी केला. तसेच सत्तेशिवाय ज्यांना करमत नव्हतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हते तर राज्यातील नेते होते, असे म्हणत पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.

Tags

follow us