दिल्लीतील आंदोलनाचं राजकारण करू नका, जेपी नड्डा यांचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल
दिल्लीतील आंदोलनाचे राजकारण करू नका, असे आवाहन केले. तसेच ज्या ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, त्या त्या राज्यात किती पेपर लीक झाले याची यादी दिली.
भाजपचे केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी (BJP) पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार प्रहार केला आहे. हिमाचल, पश्चिम बंगाल, तेलंगणा, झारखंड, तामिळनाडू या राज्यांत अनेकवेळा पेपर लीक झाले आहेत. दरम्यान, यावेळी त्यांनी दिल्लीतील आंदोलनाचं राजकारण करू नका, असं आवाहन करत सत्ताधारी पक्ष विरोधक सांगतील तितक्या वेळ चर्चा करू असं आवाहन केलं आहे. आता यावर काँग्रेस काय उत्तर देणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.
शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी आणि बेरोजगारी हेच देशातील विद्यार्थ्यांच्या असंतोषाचे कारण-राहुल गांधी
विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत एका विषय मांडला. यात त्यांनी 150 पेपर लीक बाबत भाष्य केलं. राहुल गांधी यांनी केलेल्या 150 पेपरफुटीच्या दाव्याची सखोल चौकशी केली जाईल आणि त्यामागील सत्य देशासमोर मांडलं जाईल. पेपरफुटी हा अत्यंत गंभीर विषय असून त्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक आहे असंही नड्डा यावेळी म्हणाले.
आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. संसदेत चर्चा केली जाईल, सीजेपीसोबतही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले मुद्दे योग्य आहेत. सरकार या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा बारकाईने अभ्यास करत असून, परीक्षा व्यवस्थेतील जिथे त्रुटी आढळतील त्या दूर केल्या जातील असंही ते म्हणाले. त्याचबरोबर नड्डा यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘पेपरफुटी ही अतिशय गंभीर समस्या आहे आणि यावर सखोल चर्चा होण्याची गरज आहे. कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही असंही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केलेला 150 पेपरफुटीचा दावा आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. यावर सरकारने स्पष्ट भूमिका घेत प्रत्येक दाव्याची सत्यता तपासली जाईल, जबाबदार सरकार म्हणून आम्ही या दाव्याची निश्चितच चौकशी करू आणि सत्य जनतेसमोर मांडू.’ दरम्यान, गेल्या काही काळापासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, मात्र या विषयावर नड्डा यांनी बोलणं टाळलं आहे.