आज लाडक्या गणरायाचं आगमन, राज्यभरात भक्तांची लगबग; जाणून घ्या गणेशोत्सवाचे सर्व अपडेट्स

Ganesh Chaturthi Update : गणेशचतुर्थीचा आज पहिला दिवस आहे. सकाळपासून महाराष्ट्रातील विविध भागात गणेश स्थापनेची लगभग सुरू आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 14T075642.995

Ganesh Chaturthi Update : महाराष्ट्रात आजपासून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेशचतुर्थीचा आज पहिला दिवस आहे. सकाळपासून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागात गणपती दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींची सुद्धा मनोभावे पूजाअर्चा सुरु आहे. अनेकांची बऱ्याच दिवसांपासून घरगुती गणपतीसाठी आणि अनेक गणेश मंडळांची सार्वजनीक उत्सवाची तयारी सुरु आहे. आज तो दिवस आला आहे. मुंबईतील चाकरमनी, नोकरदार वर्ग गणपतीसाठी गावी गेला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, कोकण या भागातही गणेशचतुर्थीचा मोठा उत्साह पहायला मिळतोय.

पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची मिरवणूक किती वाजता निघणार?
पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मिरवणूक निघणार पारंपारिक पद्धतीने. सकाळी आठ वाजता मुख्य मंडप येथून मिरवणूक सुरू होणार आहे. रास्ता पेठ येथून पालखी मध्ये गणेश विराजमान झाल्यानंतर मिरवणूकीला सुरुवात. मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची 11.45 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार. ढोल ताशांच्या गजरात श्री कसबा गणपतीची मिरवणूक पार पडणार.

श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मिरवणूक

सकाळी 8.30 वाजता रमणबाग येथून मिरवणुकीला होणार सुरुवात. मयुरेश्वर रथाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. यावर्षी वृंदावन मधील प्रेमाचं प्रतीक असलेल्या मंदिराचा देखावा करण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक सजावट. सकाळपासूनच दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे.

अंबरनाथमध्ये भर पावसात गणरायाचं आगमन

अंबरनाथमध्ये भर पावसात गणरायाचं आगमन झालं. डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन भक्तांचा उत्साह. बाप्पाच्या आगमनात बच्चे कंपनीचा जल्लोष. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.

लालबागच्या राजाच्या दर्शनाला  गर्दी

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबाग राजाच्या दर्शनाला सकाळपासून अलोट गर्दी झाली आहे. कालपासूनच भक्तगण नवसाच्या रांगेत थांबले होते. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उद्धव ठाकरे आज लालबाग राजाच्या दर्शनाला येणार आहेत.

मुंबईच्या राजाची आरती सुरु

मुंबईचा राजा असलेल्या गणेश गल्लीतील गणपती बाप्पाच्या पूजेला सुरवात झाली आहे.गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील सर्व पदाधिकारी आणि भक्तगण या पूजेला उपस्थित आहेत. आरती सुरु आहे.

No liveblog updates yet.

LIVE NEWS & UPDATES

Tags

follow us