Jitendra Awhad :शरद पवारांबद्दल आदराने बोलावं; ‘त्या’ वक्तव्यावरून आव्हाडांचा आंबेडकरांना इशारा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवशक्ती आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भीमशक्ती यांची नुकतीच युती झाली आहे. मात्र, वंचित आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. यातच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शाब्दिक टीका केली आहे. यावर आमदार जितेंद्र […]

Untitled Design (37)

Untitled Design (37)

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवशक्ती आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भीमशक्ती यांची नुकतीच युती झाली आहे. मात्र, वंचित आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. यातच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शाब्दिक टीका केली आहे. यावर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी आंबेडकर यांना शाब्दिक इशारा दिला आहे.
YouTube video player
नेमकं काय म्हणाले होते आंबेडकर? जाणून घेऊ
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. आंबेडकर म्हणाले, शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल, असा खळबळजनक गौप्यस्फोट आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान आंबेडकर यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सुरु पसरला आहे. यातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर संताप व्यक्त करत ट्विटद्वारे प्रकाश आंबेडकरांना एका इशारा दिला आहे. यामुळे युती आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरु झाल्याचे पाहायला मिळते आहे.

नेमकं काय म्हणाले आव्हाड? जाणून घ्या
महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी, असा सल्ला आव्हाड यांनी आंबेडकरांचं नाव न घेता दिला आहे.

दरम्यान शिवशक्ती व भीमशक्ती युती तर झाली मात्र आता प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मात्र त्याआधीच त्यांनी शरद पवारांवर केलेल्या या विधानाने मविआमध्ये वाद निर्माण झाला आहे. यावर अद्याप शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

Exit mobile version