Eknath Khadse : राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा आदेश प्रसिद्ध केला. यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. परंतु, राज्य सरकारने हा जीआर काढून ओबीसींचे मोठे नुकसान केले. या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा आली आहे अशी भावना ओबीसी समाजात तयार झाली आहे. ओबीसी नेत्यांनीही या जीआरला कडाडून विरोध केला आहे. आता तर ओबीसी समाजातील लोकही आत्महत्या करू लागले आहेत. या सगळ्या घडामोडी घडत असताना शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.
खडसे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या मुद्द्यावर खडसे म्हणाले, आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट (Eknath Khadse) केली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण (Maratha Reservation) देण्यास कोणतीही हरकत नाही. परंतु, ओबीसीतील आरक्षण जर कुणी चोरून घेत असेल तर त्याला (OBC Reservation) नक्कीच आमचा विरोध राहील.
एकनाथ खडसे… काय तुझी ही व्यथा! लोढासोबत फोटो पोस्ट करत महाजनांचा पलटवार
मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) अल्टिमेटम दिला आहे की 17 सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणीस सुरुवात केली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू असे विचारले असता खडसे म्हणाले, मला वाटतं हा प्रश्न सरकार आणि जरांगे यांच्यातील आहे. सरकार आणि जरांगे यांनी बसून तो सोडवावा. महाराष्ट्रातील स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न कुणी केला हे सर्वांनाच माहिती आहे. जातीजातीत भानगडी लावणं. ओबीसीला संरक्षण देणं नंतर मराठा समाजाला संरक्षण देणं. ह्याला आरक्षण मग त्याला आरक्षण अशी भूमिका सरकारने घ्यायला नको होती. एक स्पष्ट भूमिका घेण्याची गरज होती. म्हणजे वातावरण इतकं चिघळलं नसतं असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात सध्या संघर्षाची स्थिती
महाराष्ट्रात अलीकडचं चित्र पाहिलं तर जातीजातीत आणि धर्माधर्मात एक संघर्षाची भूमिका तयार झाली आहे. ओबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलन सुरू झालं. त्यानंतर बंजारा समाजाने एसटीत आरक्षण मागितलं. कोळी समाजानं महादेव कोळी वगैरे एसटीचं आरक्षण मागितलं. लिंगायत समाजाने आम्हाला वेगळा धर्म द्यावा अशा स्वरुपाची भूमिका मांडली. एकंदरीत महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. स्वास्थ्य बिघडताना पाहून शरद पवारांनी यांसदर्भातली भूमिका स्पष्ट केली की सामाजिक स्वास्थ्य टिकवणं ही महाराष्ट्राची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
सुरेश धस आणि वाल्मिक कराड दोघांचीही चौकशी झाली पाहिजे.. एकनाथ खडसेंची मागणी