Download App

महत्व कशाला? शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की अयोध्या दौऱ्याला? पवारांनी फटकारले

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar on Ayodhya tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळच या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya tour) गेलं आहे. या अयोध्या दौऱ्यासंदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटासह अनेकांनी टीका केली. त्यावर प्रतिक्रिया देतांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्येत गेल्यावर हा आमच्या श्रध्देचा विषय आहे, असं सांगितलं होतं. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलचं फटकारलं आहे. महत्व कशाल द्यायचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की, अयोध्येला? त्यांची श्रध्दा अयोध्येत असेल तर आमची श्रध्दा ही शेतकऱ्यांमध्ये आहे, असं पवार म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. राज्य सरकारमधील अनेक मंत्री, आमदार हे या दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शरद पवार यांनी सांगितले की, अयोध्येचा दौरा हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांना महत्वाचा वाटतो. राज्यात आज महत्वाचे प्रश्न काय आहेत, अयोध्या यात्रा आहे का, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत? सर्व मंत्रिमंडळ आणि खासदार अयोध्येला जाऊन बसणं आणि त्या कामाला प्राधान्य देणं याचा अर्थ जनतेच्या प्रश्नांना बगल देणं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, आमच्या श्रध्देचा विषय आहे. त्यांची श्रध्दा तिथं आहे. त्यांना तसं म्हणण्याचा अधिकार आहे. आमची श्रध्दा ही शेतकऱ्यांत आहे. त्याचं जे नुकसान होत आहे, त्याच्याशी निगडीत आहे. आज अवकाळी पावसामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालं. या पावसाने आंबा, द्राक्षे, भाजीपाला याचं जे नुकसान झालं, त्यामुळं बळीराजा हताश आहे. त्यांच्या डोळ्यातील पाणी कसं पुसता येईल, आणि त्याला अरिष्टातून बाहेर कसं काढता येईल, यात आमची श्रध्दा आहे,अशी टीका त्यांनी केली.

Dalai Lama : दलाई लामा वादाच्या भोवऱ्यात! वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे म्हणाले की, आम्ही अयोध्येत असलो तरी सरकारची सगळी काम सुरू आहेत. इथून आमचं सगळं काम सुरू आहे. राज्याचे कृषीमंत्री हे राज्यात आहेत. ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. पूर्वीच्या सरकारने फक्त घोषणा केल्या आहेत. मात्र, त्या घोषणांची पूर्तता ही आम्ही केली. आमचं सरकार हे शेतकऱ्यांप्रती संवदेनशील आहे. शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे, अशी आम्ही प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना केली.

फडणवीस यांनी सांगितले की, टीका करणं हे त्याचं कामचं आहे. त्यांना प्रभू श्रीराम यांच्याविषयी आस्था नसेल, पण आम्हाला आस्था आहे. प्रभ श्रीराम यांनी राज्य कसं चालवावे, हे सांगितलं. महात्मा गांधींजींनाही राम राज्य अपेक्षित होतं. आणि रामराज्य आणायचं असेल तर आम्हाला तर दर्शन घ्यायलाचं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

Tags

follow us