Download App

Saif Ali Khan Attack : ‘एकाची हत्या आणि दुसऱ्याच्या…’ सैफवरील जीवघेण्या हल्ल्यानंतर पवारांचे गृहमंत्र्यांकडे बोट

मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासाळण्याचे हे लक्षण आहे. याच भागात मध्यंतरी एकाची हत्या झालीय, हा हत्येचा दुसरा प्रयत्न आहे. - शरद पवार

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar Reaction on Saif Ali Khan Attack : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाला. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या एका व्यक्तीने त्याच्यावर हा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तात्काळ लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं. दरम्यान, या हल्ल्यानंतर बॉलिवूडसह राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. आता शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करत या प्रकरणात राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केली.

अनुपमा शोमध्ये येणार मोठा ट्विस्ट, शिवम खजुरियांनी खुलासा केला 

शरद पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासाळण्याचे हे लक्षण आहे. याच भागात मध्यंतरी एकाची हत्या झालीय, हा हत्येचा दुसरा प्रयत्न आहे. या सर्व गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी जे गृहमंत्री आहेत, त्यांनी याकडे गांभीर्याने पाहावं, अशी विनंती शरद पवारांनी केली.

कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईत अशा प्रकारची घटना घडणं हे दुर्दैवी आहे. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं हे उदाहरण आहे. लोक चाकू, कोयदे घेऊन फिरू लागले आहेत. घरात घुसून लोकांना मारत आहेत. महाराष्ट्रात जे घडतंय, ते धक्कादायक आहे, असं गायकवाड म्हणाल्या.

‘इलू इलू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित, एली अवराम मराठी चित्रपटात करणार पदार्पण 

सरकार गुन्हेगारीला उखडून टाकणार का?
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिले की, अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चोरट्याने चाकू हल्ला केल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. ते लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा! पण या हल्ल्याच्या निमित्ताने राज्यातील गुन्हेगारी कोणत्या स्तराला गेली, हे दिसून येतं. खून, खंडणी, चोरी हे गंभीर गुन्हे सर्रास घडगत असू्न मुंबईत वांद्रे सारख्या भागातही सुरक्षित वातावरण नाही, हे चिंताजनक आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे घर सुरक्षित नसेल, तर सामान्य माणसाचे काय? सरकार गंभीर होऊन या गुन्हेगारीला समूळ उखडून टाकणार की नाही हा खरा प्रश्न आहे, असं त्यांनी म्हटलं.

follow us