Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले आहे. 234 जागांवर महायुतीने विजय मिळवला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अवघे 10 उमेदवार विजयी झालेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रथमच माध्यमांशी संवाद साधला.
Gautam Adani Group: गौतम अदानी पुन्हा अडचणीत, बांगलादेशात ‘या’ डीलची होणार चौकशी
विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. आता त्यांचे वय 83 वर्षे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर शरद पवार निवृत्त होणार का? ही चर्चा सुरू झाली. त्या प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी दोन शब्दात उत्तर दिलं. माझ्या निवृत्तीची वेळ विरोधकांनी सांगू नये, असं ते म्हणाले.
पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पुढं ते म्हणाले की,
निवडणुकीनिमित्ताने मी संपूर्ण राज्यात फिरला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली होती. पण जशी अपेक्षा होती तसा हा निकाल लागला नाही. शेवटी हा लोकांनी दिलेला हा निर्णय आहे. त्यामुळे या निकालाविरोधात न्यायालयात जाण्याचा आमचा विचार नाही. तर पराभवाची कारणमीमांसा करून नव्या जोमाने पुन्हा लढू. आमच्या सोबत जी युवा पिढी काम करते, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लक्ष केंद्रीत करणार आहे, असं पवार म्हणाले.
‘ज्यांनी मला त्रास दिला ते सगळेच साफ…’; अशोक चव्हाणांची थोरातांसह कॉंग्रेसच्या पराभूत नेत्यांवर टीका
पुढच्या काळात झेडपी, महानगरपालिका, पंचायत समिती निवडणुका होणार असून त्यासाठी जोरदार तयारी करणार, असं ते म्हणाले.
महायुतीच्या विजयाविषयी बोलताना पवार म्हणाले की, बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे मतांचे ध्रवीकरण झालं. शिवाय, महायुती सत्तेत आली नाही तर लाडकी बहीण योजना बंद होईल, आम्ही सत्तेत राहिले तरच योजना सुरू राहील, असा प्रचार सत्ताधाऱ्यांनी केला. त्याचा मोठा परिणाम निवडणुक निकालवर झाला, असं पवार म्हणाले.
ईव्हीएमवर पवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले. त्यावर याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही. महाराष्ट्रात निवडणुकीसाठी आलेले ईव्हीएम मध्य प्रदेशातून आल्याची चर्चा असल्याचं माध्यम प्रतिनिधींनी पवारांना सांगितले. त्यावर पवार म्हणाले, ईव्हीएम मध्य प्रदेशातून आले की, गुजरातमधून यासंदर्भात जोपर्यंत माझ्याकदडे अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही.
राष्ट्रवादी कोणाची?
निवडणुक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांची असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या आहेत. हे नाकारण्याची गरज नाही. पण राष्ट्रवादीचा संस्थापक कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे, असे शरद पवार म्हणाले.