कोल्हापूर : सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा आणि संध्याची परिस्थिती याबाबत आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यानंतर आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे येत्या 7 मे रोजी पार पडणाऱ्या मतदानाची. मात्र, मतदानापूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगलीच्या जागा वाटपावेळी पडद्यामागे काय काय घडलं याबाबत मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी राज्यात मविआने लोकसभा जिंकण्यासाठी काय धोरण ठरवले याची माहितीही दिली. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. सांगलीच्या जागेबाबत बोलताना पवार म्हणाले की, सांगली एकच अपवाद आहे. जिथे चर्चा न करता हा मतदारसंघ देण्यात आल्याचे पवारांनी सांगितले. परंतु, आता निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो घेऊन मतदारांसमोर जावे, अशी भूमिकाही पवारांनी यावेळी बोलताना मांडली. (Sharad Pawar On Sangali Loksabha Seat)
शरद पवार धनंजय मुंडेंवर इतके का भडकले? वाचा, लेट्सअप खबरबातचं खास विश्लेषण
कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरेंनी सांगली घेतलं
पवार म्हणाले की, कोल्हापूर मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावरुन लढण्यासाठी इच्छुक होते. याबदल्यात ठाकरेंनी त्यांचा मतदारसंघ काँग्रेसला दिला आणि त्या बदल्यात त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीच्या जागेवर दावा केला आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी दिली. मात्र, यानंतर जे काही घडलं ते सगळ्यांनाच माहिती आहे.
सांगलीसाठी काहीतरी शिजतंय, विश्वजीत यांनी पुन्हा आळवला सूर
चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीनंतर सांगलीतून विशाल पाटलांनी (Vishal Patil) अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे आता सांगलीत तिरंगी लढत होणार असून, चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीनंतर विश्वजीत कदमांनी जोरदार नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता सांगलीची जागा काँग्रेसकडून जात नव्हती. पण काहीतरी शिजलंय, काहीतरी षडयंत्र झालं आहे असा दावा कदम यांनी केला आहे.
पुण्यात महायुती झटका! मुख्यमंत्री घरी जेवायला न आल्याने नाना भानगिरे शिवसेनेला रामराम करणार…
मोदींच्या भाषणातील पाहिले तीन-चार वाक्य स्थानिक नेत्यांची
एकीकडे मोदींनी पुण्यातील सभेत बोलताना शरद पवारांना भटकती आत्मा असे म्हटले होते. त्यानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता पवारांनी मोदींच्या प्रचार सभांमधील भाषणाबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मोदींच्या भाषणाची एक स्टाईल आहे.त्या ठिकाणी स्थानिक नेते लिहून देतात ते आणि तेच म्हणतात. लोकांचे समाधान करण्याची खात्री मोदींना नाही. त्यामुळे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो असेही पवार म्हणाले. मोदींच्या भाषणातील पाहिले तीन-चार वाक्य असतात ती कोणीतरी लिहून दिलेली असतात. स्थानिक मुद्द्यांवरुन भाषण सुरू करणं ही मोदी स्टाईल आहे. देशाच्या पंतप्रधानांना सर्व राज्य सारखी असतात असं बोलायचं नसतं, असेही शरद पवार म्हणाले.