Sharad Pawar Retirement : ‘देशातील तमाम जनतेची इच्छा आहेच’.. पवारांच्या निवृत्तीवर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते करत आहेत. त्यानंतर आता विरोधी पक्ष भाजपमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. प्रदीर्घ काळ अध्यक्षपदी राहील्यानंतर थांबावस […]

Atul

Atul

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते करत आहेत. त्यानंतर आता विरोधी पक्ष भाजपमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेतील आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की प्रदीर्घ काळ अध्यक्षपदी राहिल्यानंतर थांबावसं वाटणे स्वाभाविक आहे. कार्यकर्त्यांच्या दबावामुळे तो निर्णय मागे घेतला तर तेही स्वाभाविक आहे. शिवाय देशातील तमाम जनतेची इच्छा आहेच.

Sharad Pawar Retirement : अजित पवार म्हणाले, “रडारड करू नका, हे कधी ना कधी होणार होतं..”

दरम्यान, पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. ‘देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो’, ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’ अशा घोषणांनी यशवंतराव चव्हाण सेंटर परिसर दुमदुमून गेला आहे. यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांना अश्रू अनावर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील भावूक झालेले पहायला मिळाले आहेत. यानंतर सर्व कार्यकर्ते शरद पवारांची समजूत घालण्यासाठी व्यासपीठावर दाखल झालेले आहेत. त्यांच्या या निर्णयानंतर अजितदादांनी सर्व कार्यकर्त्यांची समजूत घातली आहे.

Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार

Exit mobile version