Sharad Pawar Sabha For Prabhavati Ghogre : शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे (Prabhavati Ghogre) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं राहात्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी शरद पवार म्हणाले की, हा जो रस्ता आहे. त्याची वाहनसंख्या घटली, मोठी भगदाडं पडली (Assembly Election 2024) आहेत. अनेक नेत्यांनी जाहीर केलं की, दोनशे कोटी मंजूर केलेत. कुठे गेले कुणास ठाऊक? या निधीचं झालं काय? असा सवाल शरद पवार यांनी भरसभेत केलाय. मोठी मोठी आश्वासनं द्यायची, लोकांना भुलवायचं आणि प्रत्यक्ष काहीच नाही करायचं. निवडणुकीच्या आधी सगळी आश्वासनं द्यायची आणि निवडणूक झाल्यानंतर सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं, अशी टीका आज शरद पवार यांनी तनपुरे यांच्या प्रचारसभेत विरोधकांवर केलीय.
आज या मतदारसंघामध्ये देशाच्या बाहेरचे लोक साई दर्शनासाठी येतात. लोक श्रद्धेने येतात. इथे काहीतरी नवीन केलं पाहिजे. पुण्यामध्ये हिंजवडी नावाचा भाग आहे. त्या भागाचा मी खासदार होतो. मी विचार केला. काही उद्योजक बोलवले, त्या सगळ्यांशी चर्चा केली. त्यांना सांगितलं की, तंत्रज्ञानावर आधारीत व्यवसायाचं केंद्र निर्माण करतात. तेथे आज 2 लाख तरूण-तरूणी काम करतात, असं देखील शरद पवार म्हणाले आहेत. हे बदलायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल.येथे असलेला दडपशाही संपवल्याशिवाय शांत बसणार नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी. यांना धडा शिकवायची वेळ आली आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवारांनी भरसभेत केलं भावनिक आवाहन ; महाराष्ट्राचं राजकारण बदलायचं असेल, तर महाविकास आघाडीला…
विरोधकांच्या हातात सत्ता आहे. ते त्याचा वापर जनतेसाठी करत नाहीत. महाराष्ट्राचं राजकारण बदलायचं असेल तर महाविकास आघाडीला मत द्या. हे लोक सत्तेत आल्यापासून राज्याचा हरवलेला लौकिक सत्तेत गेल्यानंतर परत आणल्यावाचून राहणार नाही. यामध्ये मला तुमची मदत हवी आहे, असं भावनिक आवाहन शरद पवार यांनी राहातामध्ये झालेल्या सभेत म्हटलंय.
बॅनर वार! पंधरा मिनिटांचं एकच उत्तर; छत्रपती संभाजीनगरमध्ये लागलेल्या बॅनरने उडाली खळबळ
राहुरीमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, – लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राहुरीला आलो होतो. मागच्यावेळी काँग्रेसचा एक आणि आमचे चार खासदार होते. मात्र घटना धोक्यात असल्याने तुम्ही आमचे 31 खासदार निवडून दिले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? पक्ष उभा करायला अक्कल लागते. मात्र, फोडायला अक्कल लागत नाही अशी टीका देखील शरद पवार यांनी केलीय. यावेळी ते म्हणाले की, तुम्ही लाडकी बहीण योजना आणली. मात्र महिला सुरक्षेचे काय? बहिणींना संरक्षण नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी राहुरीत केलंय.