मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष म्हणजे राज्यातील एकमेकांचे विरोधीपक्ष पण आता हे समीकरण बदलताना दिसतय. याचं कारण असं की, नुकत्याचं ईशान्य भारातातील नागालॅंडमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या राज्यामध्ये महाराष्ट्रात विरोधक असणारे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येत सरकार बनवल आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील याचा काही परिणाम होणार का ? अशा चर्चांना उधान आलं आहे. दुसरीकडे शरद पवार आणि भाजप यांचे संबंध पाहिले तर 2014 ला देखील त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं होत. त्यानंतर 2019 ला अजित पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतली होती. त्यावर आता स्वतः शरद पवार यांनी नागालॅंडमध्ये भाजपला पाठिंबा का दिला ? याचं कारण सांगितलं आहे.
‘नागालॅंडमध्ये आम्ही भाजपा पाठिंबा दिला असं नाही. नागालॅंडमध्ये कोणताच पक्ष सत्तेच्या बाहेर राहिलेला नाही. सर्व पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी सर्वांनी हा निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे नागालॅंडमध्ये नागा लोकांचे काही प्रश्न आहेत. एक काल असा होता नागालॅंडमध्ये नागा संघटाना देश विघातक काही कार्यक्रम घेत होती. या सर्वांना एकत्र आणून यावर मार्ग काढण्याचा विचार तेथिल मुख्यमंत्री रिओ यांनी केला. ते मुख्यमंत्री भाजपचे नाहीत. पण त्यांच्यासोबत भाजप असल्याने आमच्या आमदारांनी भाजपबरोबर जाण्यास नकार दिला होता. मात्र येथे ऐक्याच्या दृष्टिने मुख्यमंत्री रिओ यांच्याकडून काही पावलं टाकली जात असतील तर आम्ही निगेटीव्ह घेणार नाही. त्याला आमचं सहकार्य असेल. त्यासाठी आम्ही नागालॅंडमध्ये भाजपला पाठिंबा दिला.’ असं शरद पवार यांनी सांगितलं.
नागालॅंडमध्ये भाजप, एनडीपीपीसोबत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसदेखील सत्तेमध्ये सहभागी झाले आहे. राज्याच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. हा निर्णय होण्याअगोदर स्थनिक नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या देखील चर्चा होत्या. पण आता नागालॅंडमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विरोधक असणारे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येत त्यांनी थेट सरकार बनवलं आहेत.
तसं पाहिलं तर नागालॅंड हे अतिशय छोटं राज्य आहे. विधानसभेच्या येथे फक्त 60 जागा आहेत. पण तेथे राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची चर्चा होणं साहजिक आहे. आता तेथे भाजप, एनडीपीपीसोबत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसदेखील सत्तेमध्ये सहभागी झाले आहे.
BJP and NCP : महाराष्ट्रात विरोधक नागालॅंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र, असं बनणार सरकार
नागालॅंडमध्ये रिओ हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आणि भाजपच्या आघाडिला 60 पैकी 37 जागा मिळाल्या होत्या. त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधीदेखील झाला आहे. यामध्ये 60 पैकी 7 जागा मिळवून याठिकाणी राष्ट्रवादी हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. पण त्यानंतर राष्ट्रवादीने रिओ यांच्याशी असलेले संबंध आणि राज्याच्या हिताचा विचार करून भाजप, एनडीपीपीसोबत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसदेखील सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागालॅंडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी दिली.