BJP and NCP : महाराष्ट्रात विरोधक नागालॅंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र, असं बनणार सरकार

BJP and NCP : महाराष्ट्रात विरोधक नागालॅंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र, असं बनणार सरकार

कोहिमा : भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष म्हणजे राज्यातील एकमेकांचे विरोधीपक्ष पण आता हे समीकरण बदलताना दिसतय. याचं कारण असं की, नुकत्याचं ईशान्य भारातातील तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडल्या यामध्ये मेघालय, त्रिपुरा आणि नागालॅंड यांचा समावेश होता. यापैंकी नागालॅंड या राज्यामध्ये महाराष्ट्रात विरोधक असणारे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येत सरकार बनवणार आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील याचा काही परिणाम होणार का ? अशा चर्चांना उधान आलं आहे. दुसरीकडे शरद पवार आणि भाजप यांचे संबंध पाहिले तर 2014 ला देखील त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं होत. त्यानंतर 2019 ला अजित पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतली होती.

नागालॅंडमध्ये भाजप, एनडीपीपीसोबत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसदेखील सत्तेमध्ये सहभागी होणार आहे. राज्याच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हा निर्णय होण्याअगोदर स्थनिक नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या देखील चर्चा होत्या. पण आता नागालॅंडमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विरोधक असणारे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येत थेट सरकार बनवणार आहेत.

तसं पाहिलं तर नागालॅंड हे अतिशय छोटं राज्य आहे. विधानसभेच्या येथे फक्त 60 जागा आहेत. पण तेथे राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची चर्चा होणं साहजिक आहे. आता तेथे भाजप, एनडीपीपीसोबत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसदेखील सत्तेमध्ये सहभागी होणार आहे.

रामदास आठवलेंच्या आरपीआयला नागालॅंडमध्ये मंत्रिपद मिळणार?

नागालॅंडमध्ये रिओ हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आणि भाजपच्या आघाडिला 60 पैकी 37 जागा मिळाल्या होत्या. त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधीदेखील झाला आहे. यामध्ये 60 पैकी 7 जागा मिळवून याठिकाणी राष्ट्रवादी हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. पण त्यानंतर राष्ट्रवादीने रिओ यांच्याशी असलेले संबंध आणि राज्याच्या हिताचा विचार करून भाजप, एनडीपीपीसोबत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसदेखील सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागालॅंडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी दिली.

त्यामुळे आता एकही विरोधक आता नागालॅंडमध्ये नसणार आहे. देशातील अभूतपुर्व अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झाली आहे. सर्वपक्षीय असं सरकार या ठिकाणी बनलेलं आहे. त्यामुळे सर्वच पक्ष सरकरच्या बाजूने असणार आहेत. 2015 पासून नागालॅंडमध्ये असं घडत. मात्र यावेळी शपथविधीच्या आधी पासूनच सर्वच पक्ष सरकरच्या बाजूने आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube