Download App

Sharad Pawar : G20 परिषदेत लोकं मोठेपणा दाखवताहेत; शरद पवारांचा घणाघात

Sharad Pawar : G20 परिषदेत लोकं मोठेपणा दाखवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे. नवी दिल्लीत G20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून या परिषदेत विदेशातून अनेक पाहुणे दाखल झाले आहेत. या परिषदेसाठी अडमाप खर्च सरकाकडून केला जात असून याचं मुद्द्यांवर बोट ठेवत शरद पवारांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.

‘भारत माता म्हणायला चांगलं वाटतं, इंडिया माता म्हणणं मनाला..’; इंडिया विरुध्द भारत वादात फडणवीसांची उडी

शरद पवार म्हणाले, आपल्या देशात आत्तापर्यंत दोन वेळा G20 ची जागतिक परिषद पार पडली आहे, पहिली परिषद माजी पंतप्रधान इंदिराजींच्या काळात झाली होती. त्यानंतर आता तिसरी परिषद नवी दिल्ली इथं पार पडत आहे, पहिल्यांदाच जेव्हा ही परिषद पार पडली, तेव्हा विदेशातून अनेक लोकं भारतात आले होते, पण आज जसं वातावरण तयार केलं जातंय, तसं वातावरण तेव्हा नव्हतं, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

जसं जालियनवाला बाग काडं झालं, तसं ‘जालन्या’वाला घडवला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

तसेच विदेशातून आलेल्या पाहुण्यांसाठी चांदीची, सोन्याची ताटं आणखीन काय काय? हे कधीच वाचण्यात आलेलं नव्हतं.विदेशातून लोकं येतात त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्यच आहे, पण या निमित्ताने काही ठराविक लोकांचा मोठेपणा दाखवण्यासाठी सत्तेचा वापर कितपत योग्य आहे? याची चर्चा जनतेत होणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

‘करा किंवा मरा’ सामन्यात बांगलादेशसमोर माफक आव्हान, सदिरा समरविक्रमाची झंझावाती खेळी

देशपातळीवरील महत्वाच्या प्रश्नांना बाजूला सारुन आपल्याला हवं तसं वातावरण तयार करुन 2024 च्या आगामी निवडणुकीसाठी हव्या त्या पद्धतीने पाऊल टाकून सामोरं जायंच हा त्यांचा उद्देश आहे. सर्वसामान्य नागरिकांचं हित, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, महागाई, याचं कुठलंही भान सत्ताधाऱ्यांना नाही हे लोकांना पटवून देणं माझं काम असल्याचंही ते म्हणाले आहेत.

‘बारामतीचा निकाल शून्य टक्के’; भर भाषणात अजित पवारांनी टोचले शिक्षकांचे कान…

‘इंडिया’ ऐवजी भारत नावाला विरोध कोणाचा होता?
जेव्हा मुलायम सिंग यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तेव्हा विधानसभेत इंडिया ऐवजी भारत असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता, मात्र, एकच पक्षाने या ठरावाला विरोध केला होता, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्षाने विरोध केल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=rlwffoiEfxw

उत्तर प्रदेशच्या ठरावाला विरोध करायचं काम ज्यांनी केलं तेच आज वेगळं वातावरण तयार करण्याचं काम करीत असून इंडिया किंवा भारत घटनेच्या पहिल्या वाक्यात यासंबंधी लिहिलं आहे, आज जे म्हणतात त्यांना जर प्रश्न विचारला की, तुम्ही इंडिया नावाने किती योजना काढल्यात? असा सवालही शरद पवार यांनी केला आहे.

follow us