‘भारत माता म्हणायला चांगलं वाटतं, इंडिया माता म्हणणं मनाला..’; इंडिया विरुध्द भारत वादात फडणवीसांची उडी

  • Written By: Published:
‘भारत माता म्हणायला चांगलं वाटतं, इंडिया माता म्हणणं मनाला..’; इंडिया विरुध्द भारत वादात फडणवीसांची उडी

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : जी-२० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर देशाचा उल्लेख इंडिया असा न करता भारत असा करण्यात आला होता. त्यामुळं इंडिया विरुध्द भारत असा नवा वाद सुरू झाला. दरम्यान, आज उबाठाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी इंडियाची भीती वाटायला लागल्यानं भाजपन इंडिया नाव बदलायचा घाट घातला, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

इंडियाचे नाव बदलून भारत असं करण्यासंदर्भात जे राष्ट्रीय स्तरावर राजकारण होत आहे. त्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादात आता फडणवीसांनी देखील उडी  घेतली आहे. अमरावती येथे खासदार नवनीत राणा यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, मोदीजींच्या राज्यात अशक्य ती गोष्ट शक्य होते. त्यामुळे आता भारत चंद्रावर गेला आहे. जे मोदीजींच्या बाजूने आहेत. त्यांना कसलीच कमी नसते. कारण, लोक त्यांना निवडून देतात. भारत माता की जय असा जयघोष केल्यानंतर फडणवीस म्हणाले की, भारत माता म्हणण्यास किती चांगलं वाटतं. इंडिया माता म्हणणं मनाला पटतं का, असा सवाल त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, बबनराव घोलपांचा उपनेतेपेदाचा राजीनामा 

ते म्हणाले, हा देश मोदींचा देश आहे. जरी काही लोकांनी हनुमान चालिसा म्हणण्यासाठी नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकले, पण, त्यांना काही लाभ झाला नाही. इथे राम चालेल, हनुमान चालेल आणि छत्रपती शिवाजी महाराज चालतील. पण, हनुमान चालीसा पठण करणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकणारे लोक इथे चालणार नाहीत, असा इशाराही त्यांनी ठाकरे गटाला दिला.

फडणवीस म्हणाले, या देशात हनुमान चालीसा म्हणायची नाही तर मग काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची का, असा सवाल उपस्थित करत मोदीजींच्या काळात आम्ही पाकिस्तानात जाऊन देखील हनुमान चालिसा म्हणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube