Sharad Pawar Speech On Uddhav Thackeray : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने एकीकडे अनेक पक्ष मोर्चे बांधणी करता असताना मात्र सध्या राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. अदानी यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीमधील मतभेद चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतले नसल्याचा खळबळजनक दावा पवार यांनी केला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीमधील पक्षांमधील वादच चव्हाट्यावर आला आहे.
नेमकं काय म्हणाले आहे पवार? जाणून घ्या
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या आपल्या विधानांमुळे आणि भूमिकेमुळे चर्चेत आहे. नुकतेच त्यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हंटले की, आघाडीतील मुख्यमंत्री पद हे तिन्ही पक्षांनी एकत्र येत संख्याबळानुसार ठरवले होते. यामध्ये तिन्ही पक्षाचा सहभाग होता. अशातच राजीनामा देण्याचा निर्णय कोणी घेत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांसोबत डायलॉग ठेवण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेणे त्याचे जे दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही, असे पवार म्हणाले आहे.
जगभरात पार्किन्सन आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी 11 एप्रिल रोजी जागतिक पार्किन्सन दिन साजरा केला जातो
काँग्रेस – राष्ट्रवादीमधील भेदही चव्हाट्यावर
अदानी व हिंडेनबर्ग प्रकरणावरून काँग्रेस पक्षाने अदानी यांनी घेरत त्यांच्यावर जेपीसी चौकशीची मागणी केली आहे. यातच या मुद्द्यावर शरद पवार यांनी या प्रकारची जेपीसी चौकशी गरजेची नसल्याचे म्हंटले होते. यामुळे या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये असलेले मतभेद या माध्यमातून चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष देखील महाविकास आघाडीचा भाग आहे. मात्र अशातच पवार यांच्या या वक्तव्याने आता ही आघाडी कायम राहणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.