Download App

Sharad Pawar… आता सुप्रिया सुळे नॉट रिचेबल आहेत का?

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar Not Reachable : राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकते याचा अनुभव लोकांनी घेतला आहे. त्यामुळे कालपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पक्षातील 7 आमदार देखील नॉट रिचेबल असल्याने सोशल मीडियावर विविध चर्चेना उधान आले होते. त्यांचे काही कार्यक्रम रद्द झाल्याची बातम्या माध्यमात येत होत्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार नॉट रिचेबल आहेत याला काय आधार आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

शरद पवार यांनी मध्यमाशी बोलताना सांगितले की ‘अजित पवार नॉट रिचेबल आहेत याला काय आधार आहे? ते माझ्या संपर्कात आहेत. आता सुप्रिया सुळे घरात आहेत. त्या तुमच्यासमोर नाहीत म्हणजे त्या नॉट रिचेबल नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार नॉट रिचेबल झाल्यावर अनेकांना पहाटेच्या शपथविधीची आठवण झाली होती. पुन्हा एकदा राज्यात नवीन समीकरण जुळतील का? अजित पवारांच्या डोक्यात नेमकं काय चाललं? असा सवाल केले जात होते. अजित पवार यांच्यासोबत पुण्यातील काही अमदार असल्याची देखील चर्चा होती.

कमी कपड्यांमध्ये मुली शूर्पणखासारख्या दिसतात, भाजप नेत्याचे पुन्हा वादग्रस्त विधान

पण अजितदादांनी सकाळी सकाळीच फीत कापली
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वच चर्चांना ब्रेक लावत सकाळी आठ वाजता पुण्यातील एका सोन्याच्या दुकानाचे उदघाटन केले. या सर्व चर्चा असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आपण नॉट रिचेबल नव्हतो तर तब्येतीच्या कारणामुळे आपण नियोजित दौरे रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आज अजित पवारांनी सकाळीच खराडीत सोन्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला दाखल झाले. त्यांच्या या उपस्थितीमुळे काल रात्रीपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. तसेच राजकीय वर्तुळात ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्या काहीशा थंडावल्या आहेत.

Ajit Pawar : …आम्हीही माणूसच, नॉटरिचेबलच्या बातम्यांवरून अजित पवारांनी माध्यमांना फटकारलं

शरद पवारांनी काँग्रेसची हवा काढली
जेपीसी (जॉइंट पार्लमेंट्री कमिटी) मध्ये सत्तारूढ पक्षाचे 21 पैकी 15 सदस्य आहेत. अशा परिस्थितीत अडाणी प्रकरणात काय निर्णय लागेल ? या पेक्षा सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश यांची एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला टाईम बाउंड वेळात निर्णय घ्यायला सांगितला आहे. ते महत्वाचे आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

ते पुढं म्हणाले की कोणी तरी परदेशातील कंपनी येणार अहवाल देणार, त्या पेक्षा भारतीय सर्वोच्च न्यायालयाने अहवाल देणे अधिक महत्वाचे मानतो. या देश उभारणीत टाटा बिर्ला यांचे नाव घेतलं जातं होतं. आता अदानी-अंबानी यांचे नाव घेतलं जातं आहे. देशाच्या उभारणीत अदानी-अंबानीचं योगदान देखील मोठं आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष कसे करणार? असे शरद पवार यांनी काँग्रेसच्या जेपीसी चौकशीच्या मागणीतील हवा काढून घेतली आहे.

Tags

follow us