Ajit Pawar म्हणतात, माझी विनाकारण बदनामी…

Ajit Pawar म्हणतात, माझी विनाकारण बदनामी…

Ajit Pawar Not Reachable : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काल अचानक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. अजित पवारांच्या अशा अचानक नॉट रिचेबल होण्यामुळे अनेकांना पुन्हा पहाटे झालेल्या शपथ विधीची आठवण झाली. मात्र आता या काल रात्रीपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. तसेच राजकीय वर्तुळात ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्या काहीशा थंडावल्या आहेत.

या नॉट रिचेबल प्रकरणावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वतः माध्यमांसमोर येत आपण नॉट रिचेबल का होतो याचं कारण सांगितलं आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले, धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्बेत बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो. पण मी आराम करत असताना मिडीयावर काहीही दाखवले जात होते की, मी नॉट रिचेबल. त्याचा मला खुप त्रास झाला अशा खोट्या बातम्या दिल्या जाऊ नये. तर माध्यमांनी ‘नॉट रिचेबल’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याची नाराजी व्यक्त करत यापुढे माध्यमांनी खात्रीकरुनच बातम्या दाखवाण्याची सूचना माध्यमांना दिला.

कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही लिमीट असते. माध्यमात माझ्या विषयी आलेल्या बातम्या बघून मी व्यथित झालो. आम्ही पब्लिक फिगर असल्याने आमच्या विषयी बातम्या करण्याचा माध्यमांना अधिकार आहे. मात्र कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या चालविणे योग्य नाही अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांनी खात्रीकरुनच यापुढे बातम्या चालविण्याची सूचना माध्यमांना केली. पुणे येथे एका नियोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.

Ajit Pawar : नॉट रिचेबलच्या चर्चेनंतर अजितदादांनी सकाळी आठ वाजताच फीत कापली

दरम्यान कालपासून नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांनी या सर्व चर्चांमध्ये पुण्यातील त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. 9 आमदार घेवून गायब होतोय. या अफवा असल्याचे ते म्हणाले. आपण नॉट रिचेबल नव्हतो तर, तब्येतीच्या कारणामुळे आपण नियोजित दौरे रद्द केल्याचे अजित पवार म्हणाले. त्यानंतर आज अजित पवारांनी सकाळीच खराडीत सोनार दुकानाच्या उद्घाटनाला दाखल झाले. त्यांच्या या उपस्थितीमुळे काल रात्रीपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. तसेच राजकीय वर्तुळात ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्या काहीशा थंडावल्या आहेत.

अजित पवार त्यांच्या पक्षातील 9 आमदारांसह नॉट रिचेबेल झाल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. विशेष म्हणजे अजित पवार काल पुण्यात होते. मात्र, दुपारनंतर अचानक ते काही आमदारांसह नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या आधी अचानक अशाप्रकारच्या घडामोडी घडल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, आज सकाळी अजित पवार त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube