Ajit Pawar : नॉट रिचेबलच्या चर्चेनंतर अजितदादांनी सकाळी आठ वाजताच फीत कापली

  • Written By: Published:
Ajit Pawar : नॉट रिचेबलच्या चर्चेनंतर अजितदादांनी सकाळी आठ वाजताच फीत कापली

Ajit Pawar First Reaction After Not Reachable Rumors :  राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काल अचानक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. अजित पवारांच्या अशा अचानक नॉट रिचेबल होण्यामुळे अनेकांना पुन्हा पहाटे झालेल्या शपथ विधीची आठवण झाली. मात्र, कालपासून नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांनी या सर्व चर्चांमध्ये पुण्यातील त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. ९ आमदार घेवून गायब या अफवा असल्याचे ते म्हणाले. आपण नॉट रिचेबल नव्हतो तर, तब्येतीच्या कारणामुळे आपण नियोजित दौरे रद्द केल्याचे अजित पवार म्हणाले. त्यानंतर आज अजित पवारांनी सकाळीच खराडी परिसरातील रांका ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांच्या या उपस्थितीमुळे काल रात्रीपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. तसेच राजकीय वर्तुळात ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्या काहीशा थंडावल्या आहेत.

Sharad Pawar

Sharad Pawar

 

अजित पवार त्यांच्या पक्षातील 9 आमदारांसह नॉट रिचेबेल  झाल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या. विशेष म्हणजे अजित  पवार काल पुण्यात होते. मात्र, दुपारनंतर अचानक ते काही आमदारांसह नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत त्या आधी अचानक अशाप्रकारच्या घडामोडी घडल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, आज सकाळी अजित पवार त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

“मी सतत दौरे करत असतो त्यामुळे जागरण होत असते असे म्हणत माणूस आहे कधी आजारी पडू शकतो. काल अचानक मला पित्ताचा त्रास झाला, त्यामुळे आपण औषधं घेऊन विश्रांती घेतली. मात्र, या विश्रातीच्या विपर्यास करून आपण नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरू  करण्यात आल्या.

शरद पवारांची प्रतिक्रिया काय? 

दरम्यान, एकीकडे अजित पवार नॉट रिचेबल होण्याच्या चर्चांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अजित पवार नॉट रिचेबल आहेत याला काय आधार आहे? ते माझ्या संपर्कात आहेत. आता सुप्रिया सुळे घरात आहेत . त्या तुमच्यासमोर नाहीत म्हणजे त्या नॉट रिचेबल नाहीत असे पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube