Download App

Sharad Pawar : जे सोडून गेले त्यांच्यासाठी परतीचे दारं बंद; अजितदादांच्या येण्याबाबत पवारांचं मोठं वक्तव्य

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar : एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांनी बंड करून भाजपसोबत जात सत्तेमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आता खरा पक्ष कुणाचा यावरून वाद सुरू आहे. या दरम्यान दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारेप केले जात आहेत. त्यामध्ये आता एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाबद्दल पुन्हा एकत्र येण्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळली ! सहा कामगारांच्या जीवनाचा ‘दोर’ तुटला

काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, कळत नकळतपणे आपले सोडून गेलेले काही सहकारी हळूच शंका करतात की, जे झालं ते झालं. आता आम्ही कामाला लागलो. पण परत आल्यावर काय? पण मी त्यांना सांगेन की, हे डोक्यातून काढून टाका की, तुम्ही परत याल असा निर्णय आपण घेणार नाही. की आशा संकटाच्या काळत जे मजबूतपणे उभे राहिले. तेच खरे त्यामुळे त्यांच्याच साथीने निवडणुकीला सामोरं जायचं. अशीच भूमिका आम्ही घेतली आहे. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या गटाबद्दल पुन्हा एकत्र येण्याबाबत पवार यांनी दिली. ते कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.

Ravindra Dhangekar : आरक्षण लवकरात लवकर दिले नाही तर मोठा स्फोट होणार…

त्यामुळे आता अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार हे शरद पवारांसोबत परत येणार का? या प्रश्नाला स्वतः शरद पवार यांनीच उत्तर दिले आहे. त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार यांच्या परतीचे दोर शरद पवार यांनी कापून टाकले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही गटांच्या एकत्र येण्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Tags

follow us