Sharad Pawar Announce Supriya Sule, Prafull Patel as Executive Chairman : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
#WATCH | NCP chief Sharad Pawar appoints Praful Patel and Supriya Sule as working presidents of the party pic.twitter.com/v8IrbT9H1l
— ANI (@ANI) June 10, 2023
सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्र, पंजाब व हरियाणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात व गोवा या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी या कार्यक्रमाच्या प्रसंगी दिल्ली येथे सुप्रिया सुळे उपस्थित नव्हत्या. सुप्रिया सुळे या मुंबईत होत्या. तर अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल ही नेते मंडळी दिल्ली येथे शरद पवारांसोबत उपस्थित होती.
मोदी-शहांच्या रडारवर शिंदेंचे पाच मंत्री; गच्छंतीनंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार
मागच्या महिन्यात शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी आपण पक्षाचा राजीनामा देणार असे म्हटले होते. त्यानंतर एकच कल्लोळ उडाला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत शरद पवारांनी राजीनामा घ्यावा, असे म्हटले होते. त्यानंतर पक्षाच्या कमिटीने त्यांचा राजीनाम नामंजूर केला होता. या सगळ्यानंतर आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शरद पवारांनी थेट सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार”.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे…
— Supriya Sule (@supriya_sule) June 10, 2023
प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया
माझ्यासाठी कोणतीही जबाबदारी नवीन नाही. सुरुवातीपासून पवार साहेबांसोबत राष्ट्रीय पातळीवर मी काम करत आलेलो आहे. जी जबाबदारी पक्षानी आणि पवार साहेबांनी दिली ती मी पार पाडत आलेलो आहे. माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नाही पण आनंदाची बाब आहे.
मोदी-शहांच्या रडारवर शिंदेंचे पाच मंत्री; गच्छंतीनंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार