Download App

शरद पवारांच्या एका दगडात किती पक्षी घायाळ?; युवा ब्रिगेड जोमात

Sharad Pawar retirement : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अध्यक्षपदाचा गोंधळ अखेर मिटला आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत आपण अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. ही घोषणा करताना फ्रेममधील चित्र वेगळं होतं. नेहमी प्रमाणे दिसणाऱ्या दिग्गज नेत्यांऐवजी युवा ब्रिगेड दिसून आली. यामध्ये आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap), सक्षणा सलगर (Sakshana Salgar), सोनिया दुहन (Sonia Duhan), धीरज शर्मा आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे युवा नेते शरद पवारांच्या पाठीमागे बसले होते.

शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. आज पत्रकार परिषदेत आपण कार्यकर्त्यांच्या भवानांचा आदर करत अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत आहे पण कोणतंही जबाबदारीचं पद स्वीकारणार नाही असे शरद पवार यांनी सांगितले. पण यावेळी नेहमी प्रमाणे दिसणारे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड या नेत्यांऐवजी शरद पवार यांच्या पाठीमागे युवा नेते बसले होते.

‘आमच्यात कोणतेही वाद नाही’…अजित दादांच्या अनुपस्थितीवर पाहा पवार काय म्हणाले

शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठा बदल होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. हे सगळं बोलत असतानाच पवारांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं की एनसीपीचे नेते भाजपात जाऊ इच्छितात आणि सुप्रिया सुळे पुढच्या अध्यक्ष होतील या गोष्टीत तथ्य नाही. त्या कार्याध्यक्ष वगैरे होणार नाहीत हेही त्यांनी सांगितले.

कार्याध्यक्षपदाबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पवारांनी सविस्तर सांगितले

शरद पवार एवढी मोठी घोषणा करत असताना अजित पवारांची अनुपस्थिती होती. यावर पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता त्यांनी आमच्या संघटनेत कुठलेही वाद नाहीत. पत्रकार परिषदेत सर्व जण असतात का? कोण आले? कोण आले नाही? हे चित्र रंगवू नका, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us