‘आमच्यात कोणतेही वाद नाही’…अजित दादांच्या अनुपस्थितीवर पाहा पवार काय म्हणाले

Untitled Design   2023 05 05T185929.043

Sharad Pawar Speak On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय आज पत्रकार परिषद घेत मागे घेतला. मात्र हे सगळं सुरु असताना चर्चा रंगली ती म्हणजे अजित पवार कोठे आहे? या पत्रकार परिषदेला अजित पवार हे गैरहजर होते. यावर शरद पवार म्हणाले, आमच्यात कोणतेही वाद नाही, असे म्हणतच त्यांनी या प्रश्नांना पूर्णविराम दिला. असे असले तरी अजित पवार यांची अनुपस्थिती यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो आहे अशी घोषणा केली होती. त्यांच्या या वक्तव्यांनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अखेर तीन दिवसांनी कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या भावनांचा आदर करत शरद पवार यांनी आपला पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा अखेर मागे घेतला. दरम्यान शरद पवार यांच्या या पत्रकार परिषदेला अजित पवार यांनी दांडी मारली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. यावर शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले.

यावर बोलताना पवार यांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न केला. ते म्हणाले, करीत पत्रकार परिषदेला सर्वच पत्रकार हजर राहतात का? तसेच माझ्या निर्णयाची अजित पवार यांना कल्पना देण्यात दिलेली आहे. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या घोषणेनंतर मला माझ्या निर्णयानंतर अजित पवार यांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती असे पवार म्हणाले.

अध्यक्षपद स्वीकारले तरी उत्तराधिकारी… पवारांनी स्पष्ट केली भूमिका

तसेच आमच्यामध्ये कोणतेही वाद नाही आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. असे म्हणतच अजित पवारांच्या गैरहजेरीवर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान एकीकडे असे असले तरी आजच्या पत्रकार परिषदेला अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. मात्र एवढा मोठा निर्णय होत असताना अजित पवार यांची अनुपस्थिती ही चर्चाना उधाण आणत आहे.

Tags

follow us