Politics : पहाटेच्या शपथविधीमागं शरद पवारांचा हात? जयंत पाटलांच्या वक्तव्यामुळं खळबळ

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी मोठं राजकीय वक्तव्य केलंय. या वक्तव्यामुळं राजकारणात महाराष्ट्राच्या खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)आणि अजित पवार (Ajit Pawar)यांचा पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. ते वृत्तवाहिनीच्या एका प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. जयंत पाटलांच्या […]

Untitled Design   2023 01 26T135313.903

Untitled Design 2023 01 26T135313.903

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी मोठं राजकीय वक्तव्य केलंय. या वक्तव्यामुळं राजकारणात महाराष्ट्राच्या खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)आणि अजित पवार (Ajit Pawar)यांचा पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. ते वृत्तवाहिनीच्या एका प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. जयंत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलंय.
YouTube video player
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन 23 नोव्हेंबर 2019 रोजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु हे सरकार फारकाळ टिकू शकले नाही. मात्र हा पहाटेचा शपथविधी देशभरात चर्चेचा विषय ठरला होता, आता पुन्हा एकदा जंयत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते. राष्ट्रपती राजवट उठवणं गरजेचं होतं, त्यामुळं पवारांची ती खेळी असू शकते, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळं आता पहाटेच्या थपथविधीमागं शरद पवारांचा हात होता का? असा प्रश्न निर्माण झालाय.

Exit mobile version