NCP Appointments in Pune and Thane : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्यात पक्षाने महत्त्वाच्या पदांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या असून, अनुभवी नेत्यांना संघटना मजबूत करण्याची संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
मराठी भाषेच्या परीक्षेत राज्यात 7,750 रिक्षाचालक नापास; हजारोंचे ट्रेनिंग अजूनही बाकी
पुणे शहरासाठी पक्षाने आता दोन स्वतंत्र शहराध्यक्ष नियुक्त केले आहेत. श्रीकांत पाटील यांच्यावर पुणे पूर्व, तर विशाल तांबे यांच्यावर पुणे पश्चिम भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. शहराची संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं मानलं जात आहे.
पुण्यात पाटील-तांबेंवर जबाबदारी
प्रशांत जगताप यांनी जानेवारीत पक्ष सोडल्यानंतर श्रीकांत पाटील यांच्याकडे पुणे शहराची जबाबदारी आली होती. आता पक्षाने शहराची विभागणी करून त्यांच्या खांद्यावर पुणे पूर्वची जबाबदारी दिली आहे. श्रीकांत पाटील यांच्या कार्यक्षेत्रात शिवाजीनगर, कोथरूड, वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल.
तर विशाल तांबे यांना पुणे पश्चिम शहराध्यक्ष करण्यात आलं आहे. ते खडकवासला, हडपसर, पर्वती आणि कसबा या विधानसभा मतदारसंघांची संघटनात्मक जबाबदारी सांभाळतील. तांबे यांनी यापूर्वी महापालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून काम पाहिलं आहे. ते तीन वेळा नगरसेवक राहिले असून पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे.
“तू रोज उशिरा येतोस, म्हणून तुझी नोकरी जातेय…” असं म्हणत चक्क AI ने नोकरीवरून काढलं
श्रीकांत पाटील हेही माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या वडिलांनी पुण्याच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणाचा अनुभव असलेल्या या दोन्ही नेत्यांना पक्षाने संघटनात्मक जबाबदारी दिली आहे.
बाळ्यामामांना ठाणे ग्रामीणची कमान
ठाणे जिल्ह्यातही राष्ट्रवादीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्याकडे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे.
ब्रेकिंग : राखीपोर्णिमेपासून महाराष्ट्रात लागू होणार धर्म स्वातंत्र्य कायदा; अधिसूचना निघाली
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रमुख नेत्याचा पराभव करत म्हात्रे त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यातील त्यांच्या प्रभावाचा फायदा पक्ष संघटना वाढवण्यासाठी करून घेण्याचा प्रयत्न या नियुक्तीतून दिसून येत आहे.
जिल्हाध्यक्षांच्या बैठकीनंतर संघटनात्मक हालचाली वाढल्या
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची महत्त्वाची बैठक झाली होती. आगामी निवडणुका, संघटनेची सद्यस्थिती आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.
‘ट्रम्पना स्वीय सहाय्यक हवा असेल तर विखेंना घेऊन जा!’; लंके-विखेंमध्ये टोलेबाजी सुरूच
या बैठकीनंतर पक्षाकडून विविध पदांवर नियुक्त्यांचा वेग वाढला आहे. पुणे आणि ठाण्यातील नव्या नियुक्त्यांकडेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचा एक भाग म्हणून पाहिलं जात आहे.
