मराठी भाषेच्या परीक्षेत राज्यात 7,750 रिक्षाचालक नापास; हजारोंचे ट्रेनिंग अजूनही बाकी

Auto Rickshaw Driver Maharashtra : राज्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य

Auto Rickshaw Driver Maharashtra

Auto Rickshaw Driver Maharashtra : राज्यातील टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर तब्बल 1.65 लाख रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी अर्ज केले होते यापैकी 1.4 लाख चालकांनी ही पात्रता परीक्षा पास केली असून 7 हजार 750 चालक या परीक्षेत नापास झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच पात्रता परीक्षेत नापास झालेल्या चालकांना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार असल्याची देखील माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे आतापर्यंत 25 हजार चालकांनी या परीक्षेसाठी नोंदणी केलेली नाही. नियमांचे पालन न केल्यास तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाऊ शकतो अशी तरतूद करण्यात आली असून परिवहन विभागाची पथके गुरुवारपासून अचानक तपासणी सुरु करतील आणि ज्या चालकांना मराठी बोलता येत नाही त्यांना नियमांची पूर्तता करण्यासाठी एक महिन्याची नोटीस दिली जाणार असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.

मराठी (Marathi Language Test) ही भक्तीची भाषा आहे, सक्तीची नाही. बिगर-मराठी भाषिक लोकांनी स्वेच्छेने ही भाषा आत्मसात करणे हे राज्याच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे असं ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभ्यासक्रम मोहिम कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, कायदेशीर सक्तीऐवजी सकारात्मक दृष्टिकोनातून मराठी भाषेचा प्रसार केल्याबद्दल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, भाषा ही प्रेमाने शिकली जाते, कायद्याने नाही. त्यांनी मराठी भाषिकांना आवाहन केले की, जे लोक ही भाषा शिकत आहेत त्यांची चेष्टा करू नये त्याऐवजी त्यांच्याशी महाराष्ट्राच्या अधिकृत भाषेत (मराठीत) संवाद साधावा.

Awarapan 2 ची जादू कायम! पहिल्याच सोमवारी 10.06 कोटी रुपयांची कमाई-

तर दुसरीकडे या नियमामुळे चालकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने काही चालक संघटनांनी यापूर्वीच आक्षेप घेतले आहेत. काही संघटनांनी नियमाला कायदेशीर आव्हान देण्याचा इशाराही दिला होता.

follow us