Download App

Sheetal Mhatre : …तर आदित्य ठाकरेंची वरळीमधून हरण्याची खुमखुमी आमच्यासारखे शिवसैनिकच पूर्ण करतील

  • Written By: Last Updated:

“मी वरळीतून राजीनामा देतो आणि जर हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात वरळीत उभं राहा. निवडून कसं येता ते बघतोच,” असं आव्हान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले होत. त्यावर शिंदे गटाचे नेत्या शितल म्हात्रे यांनी त्याला उत्तर दिले आहे.

“आदित्य ठाकरे तुमचा पराभव व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर त्यासाठी आमच्या सारखे शिवसैनिक वरळीतून लढायला तयार आहेत. त्यासाठी शिंदे साहेबांना वरळीच्या मैदानात उतरण्याची गरज नाही.” अस उत्तर शितल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुण एक व्हीडीओ ट्विट करुन त्यांनी टीका केली आहे.

वरळीकरांना आपले प्रश्न घेवून आमदाराला भेटायचं असेल तर साध जनसंपर्क कार्यालय नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

नक्की काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी चॅलेंज दिलेलं आहे. मी वरळीतून राजीनामा देतो आणि जर हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात वरळीत उभं राहा. निवडून कसं येता ते बघतोच.” असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होत.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघ वरळी येथील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या आमदारांनाही आव्हान दिले होत. 40 आमदारांनी गद्दारी केली. तुम्हाला आव्हान आहे आमदारकीचा राजीमाना द्या. गद्दार खासदारांना आव्हान आहे. तुम्हीही खासदारकीचा राजीनामा द्या. निवडून येताच कसे ते पाहतो. अस आदित्य ठाकरे म्हणाले होते.

Tags

follow us