Download App

Letssupp Special : फडणवीस असे उत्तर देतात की गोगावले, बच्चूभाऊ, शिरसाट यांची धडधड वाढते….

  • Written By: Last Updated:

पुणे : राज्यात काॅंग्रेस पक्षाने अनेक वर्षे सत्ता उपभोगली. मुख्यमंत्री झालेले अनेक काॅंग्रेस नेते चतुर होते. ते आपल्या मंत्रीमंडळातील काही जागा नेहमी रिक्त ठेवत आणि आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार हा लवकरच करणार असल्याचे आवर्जून सांगत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तर हा किस्सा अनेकदा पत्रकारांना सांगितला होता. आमच्या मंत्रीमंडळातील काही जागा आम्ही नेहमीच रिक्त ठेवतो. त्यामुळे आज ना उद्या आपली मंत्री म्हणून वर्णी लागेल, या आशेवर असलेली आमदार मंडळी ही नेहमी खुर्चीवर बसलेल्या मुख्यमंत्र्याच्या मागे राहतात, असे विलासरावांचे म्हणणे असायचे. मुख्यमंत्र्याच्या विरोधात असंतोष होणार नाही, याची दक्षता विस्तार लवकरच होणार, या उत्तराने घेतली जायची. (Cabinet Expansion of Shinde-Fadnavis Government)

गुलाबराव पाटालांकडून अजितदादांना प्रत्युत्तर, ‘सकाळी एका सोबत, दुपारी दुसऱ्यासोबत आणि संध्याकाळी…’

सध्याच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रीमंडळ विस्ताराविषयी विचारले की ते नाही, असे उत्तर कधीच देत नाही. लवकरच होणार आहे, आगामी अधिवेशनाच्या आधी होईल, आगामी काही दिवसांत होईल, अशी वाक्ये शिंदे आणि फडणवीस पत्रकारांना ऐकवतात. शिंदे आणि फडणवीस हे एकत्रित दिल्लीला गेले की मंत्रीमंडळाची यादी बनवूनच घेऊन आले, अशी चर्चा सुरू होते. फडणवीस तर यापुढे जाऊन इच्छुक आमदारांची धडधड वाढवतात. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सरधोपट उत्तरात आणखी बदल करून इच्छुक आमदारांना पुन्हा स्वप्न दाखवले आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना नेहमीचा मंत्रीमंडळ विस्ताराचा प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी सफाईदारपणे याविषयी भाष्य केले. हा निर्णय झालेला आहे. पण मी त्याविषयी बोलणे उचित होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा तो विशेषाधिकार आहे. त्याच्यावर मी आक्रमण करणे योग्य नाही. एकतर विरोधक मला `सुपर सीएम` म्हणून टिका करतात. त्यामुळे याविषयी मी बोलणार नाही. मुख्यमंत्री योग्य वेळी बोलतील.“

Devendra Fadnavis मनसोक्त गप्पात हरवले, ताज हॉटेलात रंगली कष्टकऱ्यांसोबत मैफील, पाहा फोटो

फडणवीस यांनी या उत्तरात मंत्रीमंडळ विस्तार होणार नसल्याचे म्हटले नाही. पण होणारच, असेही सांगितले नाही. उलट मुख्यमंत्रीच योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचे सांगत त्यांनी हा चेंडू त्यांच्या कोर्टात ढकलला. दुसरीकडे चर्चा अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अद्याप हिरवा कंदिल आला नसल्याने हा विस्तार रखडला आहे. पण फडणवीस यांच्या या उत्तराने इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. शिवसेनेतील भरत गोगावले, बच्चू कडू, संजय शिरसाट ही मंडळी मंत्रीपदाकडे डोळे लावून बसली आहेत. संजय कुटे यांच्यासारख्या भाजपमधील अनेक नेत्यांना आपल्या समावेशाची प्रतिक्षा आहे. पण सध्या तरी शिंदे आणि फडणवीस हे दोघेही इच्छुक नाराज होणार नाहीत, अशी वक्तव्ये करत विस्ताराचा हलवा शिजवत ठेवत आहेत.

Tags

follow us